आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

चोवीस तासांत पुन्हा मंदिर टार्गेट, अाडगावच्या मंदिरातील मूर्तीच चाेरट्यांनी पळवली

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
नाशिक - रामकुंडावरीलगंगा-गोदावरी मंदिराच्या चोरीला चोवीस तास उलटत नाहीत तोच आडगावमधील श्री महालक्ष्मी मंदिरातील देवीची पंचधातूची मूर्ती चोरी झाल्याचा प्रकार रविवारी (दि. २२) सकाळी उघड झाला.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार आणि पोलिसपाटील एकनाथ मते यांच्या जबाबानुसार आडगावमधील उद्यानाशेजारील श्री महालक्ष्मी मंदिराच्या लोखंडी दरवाजाचा कडीकोयंडा तोडून पंचधातूची मूर्ती चोरी करण्यात आली. चोरट्यांनी मूर्तीवरील साडी आणि दागिने उद्यानालगतच्या ओहोळात फेकून दिले. सकाळी हा प्रकार गावकऱ्यांच्या लक्षात आला.

गावात सध्या बाहेरील तरुणांचा वावर वाढला असून, गावातील काही तरुणांसोबत रात्री उशिरापर्यंत टवाळखोरांचा वावर असल्याचे गावकऱ्यांनी सांगितले. गावात रात्री गस्त नसल्याने गुन्हे घडत असल्याचेही त्यांचे म्हणणे आहे. दरम्यान, चोरीची घटना समजताच निवृत्ती मते, माजी नगरसेवक अॅड. जे. टी. शिंदे, सुनील जाधव, यांच्यासह गावकऱ्यांनी मंदिरात प्रतिमूर्तीची प्रतिष्ठापना केली.
मंदिरआणि दानपेट्या लक्ष्य : शहरआणि परिसरात मंदिर आणि दानपेट्या चोरट्यांनी लक्ष्य केल्या आहेत. गंगापूररोडवरील तीन मंदिरे, पंचवटी परिसरात चार, नाशिकरोड- देवळाली परिसरात प्रत्येकी दोन मंदिरात चोरीचे प्रकार घडले आहेत. नवश्या गणपती मंदिरातही चोरीचा प्रकार घडला हाेता.
पोलिसांचीगस्त कागदावर : आडगावपोलिस ठाण्याच्या हद्दीत सर्वाधिक गावांचा समावेश आहे. आडगाव परिसरात पोलिसांची मध्यरात्री गस्त होते. काही ठिकाणी पोलिसांनी गस्त रजिस्टर ठेवले आहे. येथे सह्या करून गस्ती पथक पुढे जाते, मात्र पुन्हा गस्त घालत नसल्याने चोरीच्या घटनांत वाढ होत आहे.

असा प्रथमच प्रकार
^गावात प्रथमच असा प्रकार घडल्याने दहशतीचे वातावरण आहे. पोलिसांची गस्त वाढवावी. सुनील जाधव, पदाधिकारीयुवा सेना

बकाल वस्तीत वाढ
^गुन्हेगारी प्रवृत्तीच्या नागरिकांचा गावात वावर वाढला आहे. पोलिसांनी कारवाई करावी. निवृत्ती मते, पदाधिकारी,शिवसेना