आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

साधुग्राममधून अडीच लाखांचा ऐवज लंपास, लॅपटॉप मोबाइलही चोरट्यांनी लांबवला

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
नाशिक - साधुग्राममधील सेक्टर बी-२ मधील झाडी हनुमान खालसा आखाड्यात शुक्रवारी मध्यरात्री चोरीची घटना घडली. दोन लाख ६५ हजारांची रोकड मोबाइल आणि लॅपटॉप असा ऐवज चोरी झाल्याची तक्रार खालशाच्या महंतांनी पोलिसांत केली. चौकशीनंतर आडगाव पोलिस ठण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. साधुग्राममध्ये कडेकोट बंदोबस्त असूनही चोरी झाल्याने पोलिसांनी ठेवलेल्या सुरक्षाव्यवस्थेवर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे.

साधुग्राममधील सेक्टर बी-२ मध्ये दिगंबर आखाड्याचा हा हनुमान खालसा येथे शुक्रवारी गुरुपौर्णिमा उत्सवानंतर रात्री गंगादासजी यांच्या शेडमधील दोन मोबाइल, एक लॅपटॉप आणि दोन बँगेत ठेवलेली दोन लाख ६५ हजारांची रोकड असा सुमारे पावणेतीन लाख रुपयांचा ऐवज चोरी गेल्याची तक्रार गंगादासजी यांनी पोलिसांत केली आहे. या घटनेचे गांभीर्य लक्षात घेत शनविारी दुपारी पोलिस उपायुक्त अविनाश बारगळ, आडगाव ठाण्याचे वरिष्ठ निरीक्षक अनिल पवार यांनी साधुग्राममधील सुरक्षेचा आढावा घेतला. रात्रीच्या वेळी पोलिसांची गस्त होत नसल्याचा आरोप साधू-महंतांनी केला आहे. पोलिसांनी साधुग्राममध्ये सुरक्षा वाढवली आहे.

सुरक्षेत वाढ
साधुग्राममध्येचोरीचा प्रकार घडल्याने खालशांची सुरक्षा व्यवस्था वाढविण्यात आली आहे. चोरीचा तपास सुरू करण्यात आला आहे. लवकरच संशयितास पकडले जाईल. अनिलपवार, वरिष्ठनिरीक्षक, आडगाव

सुरक्षाव्यवस्थेवर प्रश्नचिन्ह
गुरुपौर्णिमेचाउत्सव साजरा केल्यानंतर आखाड्यातील सर्व साधू झोपले होते. रात्रीच बॅगमध्ये ठेवलेले पैसे, मोबाइल, लॅपटॉप चोरी झाले आहे. आम्ही कुंभमेळ्यासाठी राजस्थानवरून आलो आहोत. मात्र, या घटनेमुळे आमच्या सुरक्षेवर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे. गंगादासजी,झाडीहनुमान खालसा
बातम्या आणखी आहेत...