आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

स्टेट बँकेचे एटीएम फोडून सात लाख रुपयांची चोरी

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
नाशिक - शहरात घरफोडीच्या गुन्ह्यांत वाढ होत असताना चोरट्यांनी अाता अापला माेर्चा एटीएमकडे वळवला आहे. चाेरट्यांनी स्टेट बँक अाॅफ इंडियाचे एटीएम कटरच्या सहाय्याने फाेडून लाख ९० हजार रुपयांची रक्कम चोरी करून नेली. शनिवारी (दि. ३) सायंकाळी वाजेच्या सुमारास नाशिक-पुणे महामार्गावरील शिवाजीनगर परिसरातील भरवस्तीत आणि रहदारीच्या ठिकाणी हा धक्कादायक प्रकार उघडकीस आला. या प्रकरणी उपनगर पोलिस ठाण्यात रात्री उशिरापर्यंत जबरी चोरीचा गुन्हा दाखल करण्याचे काम सुरू होते.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, शिवाजीनगरातील गुरुदेव कॉम्प्लेक्स येथील स्टेट बँक अाॅफ इंडियाचे एटीएम गॅस कटरच्या सहाय्याने फोडून लाख ९० हजार रुपयांची रक्कम चाेरट्यांनी लांबवली. या एटीएम शेजारील दोन बँकांचे एटीएम फोडण्याचाही प्रयत्न केला. संशयितांनी नियोजनबद्धरीत्या ही चोरी केल्याचे घटनास्थळाची पाहणी केल्यानंतर निदर्शनास आले. संशयितांनी सुरुवातीला बँक एटीएमच्या सीसीटीव्हीच्या वायर कापल्या. पैसे काढण्याचा बहाणा करून शटर लावून घेत गॅस कटरच्या सहाय्याने एटीएम कापून रोकड चोरी केली. असाच प्रकार शेजारी असलेल्या तीन एटीएमवर झाला. सायंकाळी पाच वाजेच्या सुमारास बँकेचे कर्मचारी रोकड भरण्याकरिता आले होते. तांत्रिक बाबी तपासल्या असता रोकड कमी अाढळली. एटीएमची पाहणी केली असता एटीएमच्या पाठीमागे कटर कापले अढळल्यानेहा धक्कादायक प्रकार उघडकीस आला. पोलीस उपआयुक्त श्रीकांत धिवरे, वरिष्ठ निरिक्षक अशोक भगत, गुन्हे शोध पथकाचे एएसआय अशोक साळ‌वे यांच्यासह कर्मचाऱ्यांनी घटनास्थळी धाव घेत पहाणी केली. रात्री उशिरापर्यंन्त गुन्हा दाखळ करण्याचे काम सुरु होते.

पाचशेच्यानोटांचा बॉक्स चोरी : संशयीतांनीएटीएम मशिनच्या पाठीमागे कटरच्या साह्याने कापले. पाचशे रुपांच्या नोटा ठेवलेल्या बॉक्स मधिल सात लाख ९० हजार ५०० ची रोकड हात टाकून चोरी केली. मात्र हजार आणि शंभरच्या नोटांचा बॉक्स पर्यंन्त हात पोहचल्याने सुदैवाने अकरा लाखांची रोकड वाचली. सकाळी बँकेचे कर्मचारी रोकड भरण्याकरीता आले होते. दैनंदिन व्यावहाराचा गोषावरा घेत असतांना नोटा कमी अढळल्या. एटीएमची पहाणी केली असता. हा प्रकार उघडकीस आला.

एटीएमचीसुरक्षा धोक्यात : शहरातीलसुमारे दिडशे एटीएम आहेत. यातील १० ते १५ एटीएम वगळता एका एटीएमवर सुरक्षारक्षक नाही. याबाबत पोलिसांनी बँक प्रशासनाची मिटींग घेत सुचना दिल्या होत्या मात्र भारतसरकारच्या बँकेनेही देखील पोलीसांच्या या सुचांनकडे दुर्लक्ष केल्याने नागरीकांचा पैसा चोरटे घेऊन गेले.

तरबँकावर कारवाई
^एटीएम ठिकाणी सुरक्षा रक्षक नियुक्त करण्याच्या सुचना पोलीसांनी बँकांच्या व्यावस्थापकांना दिल्या होत्या मात्र या सुचनांकडे दुर्लक्ष झाल्याने हा प्रकार घडला. सुरक्षा रक्षक नसणाऱ्या बँकावर कारवाई करण्यात येणार आहे. जबरी चोरीचा तपास सुरु केला आहे. लकरच संशयीत पकडले जातील. -श्रीकांत धिवरे उपआयुक्त परिमंडळ
बातम्या आणखी आहेत...