आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

शहरामध्ये १५ महिन्यांत ६ काेटींचा एेवज चाेरीस, गुन्हे उघडकीस येण्याचे प्रमाण घटले

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
नाशिक - शहर पोलिस आयुक्तालयाच्याहद्दीत जानेवारी २०१५ ते मार्च २०१६या पंधरा महिन्यांच्या कालावधीतदिवसा-रात्रीच्यावेळी झालेल्या घरफोडीच्या गुन्ह्यांत ६ कोटी ६२ लाखांचा ऐवज चोरी झाला आहे. ४२६ गुन्ह्यांपैकी अवघे काही गुन्हे उघडकीस आणण्यात पोलिसयंत्रणेला यश आले आहे. उघड गुन्ह्यांच्या तुलनेत दाखल गुन्ह्यांची संख्या वाढत आहे. हे सराईत आणि रेकॉर्डवरील गुन्हेगार जामिनावर बाहेर आहेत. या गुन्हेगारांकडून शहरात दिवसा- रात्री घरफोडी केली जात असल्याने पोलिस यंत्रणाही चक्रावली आहे. या गुन्ह्यांमध्ये शहर परजिल्ह्यातील गुन्हेगारांचा समावेश उघडकीस आला आहे. घरफोडीचे प्रमाण रोखण्यासाठी पोलिस यंत्रणेकडून नागरिकांना नियमित सूचना केल्या जातात. मात्र, या सूचनांकडे दुर्लक्ष होत असल्याने गुन्ह्यांत वाढ झाल्याचे निदर्शनास येत आहे. निर्जनस्थळ, एकटे घर, बंद फ्लॅट आणि बाहेरगावी गेल्यानंतर होणारे घरफोडीचे गुन्हे वाढले आहेत. बहुतांश गुन्हे चार ते पाच दिवसांनंतर उघडकीस आल्याने तपासात अडचणी निर्माण होतात. बहुतांश गुन्हेगारांनी मोबाइल वापरणे बंद केले आहे. या कारणामुळे त्यांना पकडणे शक्य होत नसल्याचे यंत्रणेकडून सांगण्यात येते. १ जानेवारी ते ३१ डिसेंबर २०१५ दरम्यान घरफोडीच्या गुन्ह्यांतील बहुतांश गुन्हे उघडकीस आलेले नाहीत. जानेवारी ते मार्च २०१६ मध्ये ७८ गुन्ह्यांपैकी अवघे १० ते १२ गुन्हे उघडकीस आणण्यात पोलिसांना यश आले आहे. मात्र, गत वर्षात घडलेले गुन्हे उघडकीस येण्याचे प्रमाण घटल्याने पोलिस यंत्रणेवर हे गुन्हे उघडकीस आणण्यासाठी दबाव वाढला आहे.
शेजारी खरा पहारेकरी :
उन्हाळ्याच्या सुटीमध्ये बहुतांशी कुटुंबे बाहेरगावी जातात. याच काळात घरफोडीसह चोऱ्यांचे गुन्हे वाढतात. गुन्हे टाळण्यासाठी पोलिसांच्या सूचनांचे पालन होणे गरजेचे आहे. शेजाऱ्यांना सूचित करणे, आपला शेजारी खरा पहारेकरी असल्याने त्यांच्यावर विश्वास ठेवल्यास गुन्हे नक्की कमी होण्यास मदत होईल.
या सूचनांकडे दुर्लक्ष
बाहेरगावी जाताना शेजाऱ्यांना सांगून जावे, घरात दोन दिवे सुरू ठेवावे, सेफ्टी डोअर बसवावे, सीसीटीव्ही कॅमेरा बसवावा, बाहेरगावी जाताना पोलिसांना सूचित करावे अादी सूचना पोलिसांकडून केल्या जातात. मात्र, नागरिकांकडून त्याचे पालन हाेत नाही.
गुन्हे रोखण्यासाठी नियोजन
घरफोडीचे गुन्हे रोखण्यासाठी पोलिस यंत्रणेकडून प्रभावी नियोजन केले जात आहे. नागरिकांशी संवाद साधून प्रतिबंधक उपाय कसे करावेत, यासाठी मार्गदर्शन केले जात आहे. नागरिकांनी पोलिसांच्या सूचनांचे पालन करावे. घरफोडीच्या गुन्ह्यांचा तपास प्रगतिपथावर आहे. लवकरच गुन्हे उघडकीस येतील. -सचिन गोरे, सहायक आयुक्त, गुन्हे शाखा