आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

अडीच लाखांचे सोन्याचे दागिने पेढीतून लंपास

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
नाशिकरोड-सराफी दुकानात ग्राहक म्हणून आलेल्या तीन महिलांनी दागिने खरेदी करण्याचा बनाव करत या दुकानातून अडीच लाख रुपये किमतीच्या 102 ग्रॅम 600 मिली वजनाचे सोन्याचे दागिने लांबवले. बिटको चौकातील पोतदार ज्वेलर्समध्ये गुरुवारी भरदिवसा चोरीचा हा प्रकार घडला. सराफ व्यावसायिक मंगेश रमण पोतदार सकाळी 11 वाजेच्या सुमारास साईआनंद संकुल येथील पोतदार ज्वेलर्समध्ये दागिने लावत असताना 28 ते 30 वयोगटातील दोन महिला, 18 वर्षे वयोगटातील जीन्स पॅन्ट परिधान केलेली युवती व दोन लहान मुले ग्राहक म्हणून दुकानात येऊन त्यांनी खरेदीचा बनाव केला.
व्यावसायिक विविध डिझाइनचे दागिने दाखवत असताना त्याची नजर चुकवून काउंटरवरील दोन लाख 41 हजार 500 रुपये किमतीचे 102 ग्रॅम 600 मिली वजनाच्या दागिन्यांचे दोन पुडे चोरून पलायन केले. या महिला चोरी करताना सीसीटीव्ही कॅमेºयात कैद झाल्या असून, पोलिसांनी रेकॉर्डिंग ताब्यात घेऊन तपासास सुरुवात केली आहे. या प्रकरणी नाशिकरोड पोलिसांत चोरीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.