आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

उद्यान खराब असेल तर ठेकेदाराबराेबरच निरीक्षकावरही कारवाई

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
नाशिक- महापालिका क्षेत्रातील २८० उद्यानांची सात ठेकेदारांमार्फत देखभाल सुरू असून, यापुढे नियमित देखभाल झाल्यास मक्तेदारावर तर कारवाई हाेईलच; शिवाय उद्यान निरीक्षकालाही घरी बसावे लागेल, असा सज्जड दम अायुक्त अभिषेक कृष्णा यांनी स्थायी समिती सभेत दिला.
 
स्थायी समिती सभेत सीमा ताजणे यांनी त्यांच्या प्रभागातील कलानगर अन्य भागांतील उद्यानाच्या दुरवस्थेकडे लक्ष वेधले. एकाच ठेकेदाराकडे उद्यान देखभाल असल्यामुळे दुर्लक्ष हाेते. त्याएेवजी स्थानिक मंडळांना देखभालीचे काम द्यावे, अशी मागणी त्यांनी केली. त्याची गंभीर दखल घेत ठेकेदार नियमित काम करीत नसेल तर त्याच्यावर कारवाई करा, असे अादेश अायुक्तांनी उद्यान अधीक्षकांना दिले. उद्यानातील पाळापाचोळा, तसेच टाकाऊ बांधकाम साहित्य उचलण्याची जबाबदारी घंटागाडी ठेकेदाराची असून त्याकडे काेणी दुर्लक्ष करीत असेल तर मात्र माझ्याकडे तक्रार करा, अशी सूचना अायुक्तांनी केली. 

पेस्ट कंट्राेलच्या दंडाची मागवली माहिती 
पेस्टकंट्रोल ठेकेदारांच्या कार्यपद्धतीचा मुद्दा पुन्हा स्थायीत गाजला. यावेळी खराब सेवा दिल्यानंतर ठेकेदारावर काय कारवाई केली, किती दंड घेतला याची माहिती मागवली. त्यावर ठेक्याचा कालावधी सुरू झाल्यापासून दंडात्मक कारवाईचा अहवाल स्थायीस सादर करण्याचे आदेश आयुक्त कृष्णा यांनी िदले. 

जुन्या ठेकेदाराकडेच पालिकेच्या घंटागाड्या 
महापालिकेत पाच वर्षांकरिता नवीन घंटागाडीचा ठेका दिला असून, त्यात कचरा संकलनासाठी घंटागाड्यांची जबाबदारी ठेकेदाराची अाहे. दरम्यान, यापूर्वीच्या ठेक्यात असलेल्या पालिकेच्या घंटागाड्या मात्र जुन्याच ठेकेदाराकडे दहा महिन्यांपासून पडून असल्याचे स्थायीत उघड झाले. मुशीर सय्यद यांनी त्याकडे लक्ष वेधल्यावर प्रारंभी अाराेग्याधिकारी डाॅ. सुनील बुकाने यांनी मात्र इन्कार केला. परंतु, यांत्रिकी विभागाचे कार्यकारी अभियंता बाजीराव माळी यांनी सहा घंटागाड्या अद्याप ठेकेदाराकडे असल्याचे सांगितल्यावर अायुक्तांनी भाडेअाकारणी करण्याचे अादेश दिले. 
बातम्या आणखी आहेत...