आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

..तर देवळालीतील बाजारपेठ बंद

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
नाशिकरोड - राज्य शासनाचा एलबीटी जकात रद्द करण्याचा निर्णय पुढील महिन्यात पेट्रोलियम पदार्थावरील कर रद्द करण्याची घोषणा यांची अंमलबजावणी देवळालीतही करण्याची मागणी देवळाली व्यापारी वेल्फेअर असोसिएशनच्या वतीने कॅन्टोन्मेन्टचे मुख्य कार्यकारी अधिकारी विलास पवार यांच्याकडे केली. मागणी लवकर मान्य झाल्यास बाजारपेठ बंद करण्याचाही इशारा देण्यात आला आहे.

असोसिएशनचे अध्यक्ष सुरेश कुसाळकर, वर्किंग कमिटी अध्यक्ष नितीन गायकवाड यांच्या शिष्टमंडळाने सोमवारी दिलेल्या निवेदनात म्हटले आहे की, देवळालीत सुरू असलेल्या जकातीमुळे तीन ते चार टक्के अतिरिक्त बोजा वाढून त्याचा भार ग्राहकांवर पडत असल्याने ग्राहक देवळालीबाहेर खरेदीला पसंती देत आहे. त्यामुळे येथील मोठ्या बाजारपेठेसह अर्थव्यवस्थेवर परिणाम होत आहे. देवळालीतील एलबीटी जकात रद्द झाल्यास व्यापाऱ्यांना व्यवसाय बंद करण्याशिवाय अथवा स्थलांतराशिवाय दुसरा पर्याय राहणार नाही.
देवळालीच्या एका बाजूला भगूर नगरपालिका, तर दुसऱ्या बाजूला नाशिकरोडसाठी नाशिक महापालिका आहे. तेथे जकात नाही. मात्र, देवळालीत जकात आकारली जात असल्याने व्यापाऱ्यांच्या व्यवसायावर परिणाम झाला आहे. तत्काळ निर्णयाची अपेक्षा व्यापाऱ्यांच्या शिष्टमंडळाने व्यक्त केली. शिष्टमंडळात प्रकाश केवलानी, गौतम गजरे, तिरथ वासवानी, लियाकत काझी, नवीन गुरुनानी आदींचा समावेश होता.
आठवडे बाजार शनिवारी
मुख्यमंत्र्यांची भेट घेणार

कॅन्टोन्मेन्टप्रशासनाने लवकर निर्णय घेतल्यास मुख्यमंत्री,अर्थमंत्री याची भेट घेऊन परिस्थितीची जाणीव करून देणार असून, त्यानंतर मागणी मान्य होत नाही तोपर्यंत बाजार बंद ठेवण्याचा निर्णय घ्यावा लागेल. सुरेशकुसाळकर, अध्यक्ष, देवळाली व्यापारी वेल्फेअर असोसिएशन

शासनच निर्णय घेईल
जकात रद्द करण्याचा अधिकार केंद्र राज्य शासनाच्या अखत्यारीतील आहे. व्यापाऱ्यांच्या मागणीचे निवेदन शासनाकडे पाठवणार आहे. शासनाचा निर्णय अंतिम राहील. विलासपवार, मुख्य कार्यकारी अधिकारी, देवळाली कॅन्टोन्मेन्ट