आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • These Year Theft Declined In Industrial Colonies

अाैद्याेगिक वसाहतींमध्ये दीपावली चाेरीविना

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
नाशिक - दिवाळीतील सुटीच्या अाठवडाभराच्या काळात सातपूर अाणि अंबड या दाेन्ही अाैद्याेगिक वसाहतींत एकही चाेरीची घटना घडली नाही. यामुळे उद्याेजकांत अानंदाचे वातावरण असून, पाेलिस यंत्रणेच्या अभिनंदनाचा ठराव अायमा उद्याेजक संघटनांकडून करण्यात येणार अाहे. विशेष म्हणजे, सुनियाेजित पद्धतीने बंदाेबस्त अाणि अशाप्रकारे चाेरीविरहित दिवाळीचे हे सलग चाैथे वर्ष अाहे.

सातपूर अंबड अाैद्याेगिक वसाहतींतील उद्याेगांना दिवाळीच्या चार दिवस सुट्या असतात. यंदाही जवळपास अाठवडाभर उद्याेगांना सुट्या असल्याने कडक पाेलिस बंदाेबस्त तैनात करण्यात अाला हाेता. दिवाळीपूर्वी खुद्द पाेलिस अायुक्तांच्या उपस्थितीत अायमा रिक्रिएशन येथे वरिष्ठ अधिकारी, उद्याेजक संघटनांचे प्रतिनिधी यांच्यासमवेत बैठक घेत बंदाेबस्ताचा अॅक्शन प्लॅन तयार करण्यात अाला हाेता. नाशिक इंडस्ट्रीज अॅण्ड मॅन्युफॅक्चरर्स असाेसिएशन अाणि अंबड इंडस्ट्रीज अॅण्ड मॅन्युफॅक्चरर्स असाेसिएशन या दाेन्ही अाैद्याेगिक संघटनांकडून पाेलिसांना प्रत्येकी एक वाहन उपलब्ध करून देण्यात अाले हाेते. त्याचबराेबर बारा सुरक्षारक्षकांचीही मदत घेण्यात अाली हाेती. जागाेजागी वाहन तपासणी नाके उभारण्यात अाले हाेते, गस्तही वाढविण्यात अाली हाेती. यामुळे चाेरीची एकही घटना घडली नसल्याचे उद्याेजकांचे म्हणणे अाहे.

तक्रारी नाहीत
^कुठल्याही चाेरीच्या घटनेबाबत काहीही तक्रार अालेली नाही, थाेडक्यात विनाचाेरी दिवाळी साजरी झाली असून, पाेलिसांच्या चाेख बंदाेबस्तामुळेच हे शक्य झाले अाहे. अाम्ही अायमाच्या कार्यकारिणीच्या बैठकीत पाेलिसांच्या अभिनंदनाचा ठराव करणार असून, पाेलिस अायुक्तांची भेट घेणार अाहाेत. विवेक पाटील, अध्यक्ष, अायमा

एकही घटना नाही
^पाेलिसांच्या विश्वासावर उद्याेजकांनी बिनधास्त दिवाळी साजरी केली. एकही चाेरीची घटना घडली नसून, काेणाकडूनही तशी तक्रार अालेली नाही. पाेलिसांचे अभिनंदन करणार अाहाेत. मंगेशपाटणकर, सरचिटणीस, निमा