आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

सात महिन्यांपूर्वी फोटो स्टुडिअाेत काम करणारा कामगारच निघाला चाेरटा

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
जळगाव- ‘माझ्या घरची परिस्थिती खूप हलाखीची अाहे. त्यामुळे मला खूप पैशांची गरज हाेती. चाेरी केल्यानंतर मिळणाऱ्या पैशांतून अार्थिक चणचण दूर हाेईल, याच उद्देशाने मी २९ जुलै राेजी गुरूमा डिजिटल फाेटाे स्टुडिअाेमध्ये चाेरी करून सुमारे साडेतीन लाखांचा एेवज लंपास केला’ अशी कबुली खुद्द राहुल माेरे याने गुरुवारी जिल्हापेठ पाेलिसांजवळ चाैकशीदरम्यान दिली. माेरे हा सात महिन्यांपूर्वी स्टुडिअाेमध्ये कामाला हाेता. चाेरीच्या एक दिवसअगाेदर त्याने दुकानात दिवसभर थांबून चाैफेर पाहणी केली हाेती.

न्यायालयासमाेरील केदार देवेंद्र बाेरसे यांच्या मालकीच्या गुरूमा डिजिटल फाेटाे स्टुडिअाेमध्ये २९ जुलैला पहाटे चाेरी झाली हाेती. चाेरट्याने स्टुडिअाेमधून दाेन व्हिडिअाे कॅमेरे (एमडी-१०, पी-१५००), तीन फाेटाे कॅमेरे, दाेन हार्डडिस्क, पेन ड्राइव्ह, एलईडी टीव्ही, हजार १९० रुपये राेख असा एकूण लाख ६६ हजार ९९० रुपयांचा एेवज लाख ९५ हजार रुपयांचा डाटा लंपास केला हाेता. या प्रकरणाचा जिल्हापेठ पाेलिस ठाण्याचे सहायक पाेलिस निरीक्षक जयपाल हिरे, जनार्दन चाैधरी, भगवान माेरे, ललित पाटील, रवी वंजारी, शेखर पाटील हे तपास करीत हाेते. ही चाेरी माहीत असलेल्या चाेरट्यानेच केली असल्याचा संशय पाेलिसांना पूर्वीपासून हाेता. ताेच धागा पकडून ते तपास करीत हाेते. पाेलिसांना स्टुडिअाेमध्ये सात महिन्यांपूर्वी काम करणाऱ्या राहुल ऊर्फ भूषण मनाेहर माेरे (वय २४, रा. अमळनेर) याच्यावर सर्वात जास्त संशय हाेता. त्यामुळे ते गेल्या पंधरा दिवसांपासून त्याच्या हालचालींवर बारीक लक्ष ठेवून हाेते. यापूर्वी राहुलने चाैकशीत २८ ते ३० जुलैपर्यंत पुण्यात गेल्याचे सांगितले हाेते. त्यामुळे बुधवारी राहुलला जिल्हापेठ पाेलिसांनी पुन्हा चाैकशीसाठी बाेलाविले. त्याला उलटसुलट प्रश्न विचारल्यानंतर ताे गाेंधळल्याने पाेलिसांचा संशय पक्का झाला. त्याला त्यांनी खाक्या दाखवल्यानंतर ताे पाेपटासारखा बाेलू लागला. ‘माझ्या घरची परिस्थिती खूप हलाखीची अाहे. त्यामुळे मला खूप पैशांची गरज हाेती. चाेरी केल्यानंतर मिळणाऱ्या पैशांंतून अार्थिक चणचण दूर हाेईल, याच उद्देशाने मी २९ जुलै राेजी गुरूमा डिजिटल फाेटाे स्टुडिअाेमध्ये चाेरी करून सुमारे साडेतीन लाखांचा एेवज लंपास केला, अशी कबुली राहुलने जिल्हापेठ पाेलिसांजवळ दिली.

२२ अाॅगस्टपर्यंत पाेलिस काेठडी
जिल्हापेठपाेलिसांनी राहुल माेरे याला गुरुवारी मुख्य न्यायदंडाधिकारी के.एस.कुळकर्णी यांच्या न्यायालयात हजर केले असता, त्यांनी राहूला २२ अाॅगस्टपर्यंत पाेलिस काेठडी सुनावली. सरकारतर्फे अॅड. हेमंत मेंडकी यांनी काम पाहिले.
राहुल माेरे याच्याकडून हस्तगत केले स्टुडिअाेमधील साहित्य.
चाेरी करण्यापूर्वी राहुल माेरे हा २८ जुलैला दुपारी वाजेपर्यंत स्टुडिअाेतच बसलेला हाेता. दिवसभर त्याने स्टुडिअाेत कुठे काय अाहे? याविषयी पाहणी (रेकी) केली. त्यानंतर २९ जुलैला पहाटे त्याने स्टुडिअाेचे कुलूप ताेडून चाेरी केली. चाेरी केलेला एेवज त्याने माेपेडवरून तीन फेऱ्या करून बांभाेरी येथे राहणाऱ्या अमळनेर येथील मित्राच्या खाेलीवर ठेवला. हे साहित्य खाेलीवर ठेवले त्या वेळी त्याचा मित्र कंपनीत रात्रपाळीला गेला हाेता. त्याला ही गाेष्ट कळू नये म्हणून राहुलने २९ जुलैला सकाळीच एक कार भाड्याने घेतली. कारचालकाला स्टुडिअाे अमळनेर येथे हलवायचा असल्याचे खाेटे सांगून चाेरलेले साहित्य अमळनेर येथे घेऊन गेला. काेणालाही शंका यायला नकाे म्हणून ताे तीन दिवस जळगावात अालाच नाही. चाेरी केलेले साहित्य राहुल उल्हासनगर येथे विक्रीसाठी घेऊन जाणार हाेता. मात्र, त्याअगाेदरच पाेलिसांनी त्याला अटक केली.
बातम्या आणखी आहेत...