आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

एटीएम प्रयत्न करणारा पाेलिसांच्या जाळ्यात

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
सातपूर - अॅक्सिस बँकेचे एटीएम रविवारी रात्री १.३० वाजेच्या सुमारास फाेडण्याचा प्रयत्न करणाऱ्या संशयितास पाेलिसांच्या गस्तीपथकाने काही मिनिटांच्या अातच जेरबंद केले. चाेरीची घटना पाेलिसांना मुंबईहून कळाली हाेती.अशाेकनगर येथील महिंद्रा कंपनीच्या मटेरियल गेटसमाेरील अत्रीनंदन अपार्टमेंटमधील एटीएमवर हा प्रकार घडला.
मूळचा बिहारी वर्षांपासून शिवाजीनगर परिसरात राहणाऱ्या मुकेश मदन राम याने ताेंडाला कपडा बांधून रात्री वाजेनंतर अॅक्सिस बँकेचे एटीएम फाेडण्याचा प्रयत्न केला. मात्र, त्याचे हे कृत्य अॅक्सिस बँकेच्या मुंबई येथील कंट्राेल रूममध्ये दिसत हाेते. त्याने एटीएम फाेडण्याचा प्रयत्न करताच मुंबई येथील सायरन वाजल्याने तेथील सुरक्षा कर्मचाऱ्यांनी त्वरित चाेरास चाेरी करण्याचे एटीएममधील स्पीकरद्वारे सांगितले अाणि याच वेळी सातपूर पाेलिसांनाही कळविले. यानंतर त्याने एटीएममधून काढता पाय घेतला. मात्र, माहिती मिळाल्याने पाेलिसांच्या गस्तीपथकाने त्वरित परिसरात सापळा रचून एटीएम केंद्र गाठले. याचवेळी एका वाहनाच्या मागे लपलेल्या युवकाला ताब्यात घेत त्याच्याकडून कटर जप्त करण्यात अाले. सीसीटीव्ही फुटेज पकडलेल्या संशयितामध्ये बरेचसे साम्य असल्याने पाेलिसी खाक्या दाखविताच त्याने कबुली दिली. सहायक निरीक्षक नितीन पाटील, हवालदार डी. के. पवार, रमाकांत सिद्धपुरे, संजय चव्हाण, मनाेहर सूर्यवंशी यांच्या पथकाने ही कामगिरी केली.
अद्ययावत यंत्रणेमुळे सापडला संशयित
शहरात एटीएम चाेरीच्या घटनांमध्ये वाढ हाेत अाहे. मात्र, अद्ययावत यंत्रणेमुळे एटीएम चाेरीसारखी माेठी घटना टळली अाहे. अॅक्सिस बँकेकडे असलेल्या यंत्रणेमुळे मुंबईहून थेट कनेक्टिव्हिटी असल्यानेच चाेर सापडल्याने पाेलिस यंत्रणेनेही समाधान व्यक्त केले.
अशाेकनगर परिसरातील अॅक्सिस बँकेच्या एटीएममध्ये शिरलेला संशयित तेथील सीसी कॅमेऱ्यात जेरबंद झाला हाेता.
बातम्या आणखी आहेत...