आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

यंदा आतापर्यंत पाऊस नाशिकवर ‘मेहेरबान’

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
दारणा नदीवरील पुलासाठी तयार केलेला पावसाने वाहून गेलेला वळण रस्ता. - Divya Marathi
दारणा नदीवरील पुलासाठी तयार केलेला पावसाने वाहून गेलेला वळण रस्ता.
नाशिक - मान्सूनने जिल्ह्यातील सहा तालुके व्यापले असून, नाशिकसह सिन्नर, चांदवड, निफाड, इगतपुरी अाणि सुरगाण्यात साेमवारी पावसाने दमदार हजेरी लावली. गेल्या वर्षीच्या तुलनेत जूनमध्ये पावासात वाढ झाली आहे. गेल्या वर्षी जूनमध्ये आतापर्यंत मिलिमीटर पावसाची नोंद झाली होती. चालू वर्षी हे प्रमाण १२०४.९ मि.मी.वर पोहोचले आहे. नेहमीप्रमाणे इगतपुरीने उच्चांक गाठला असून, येथे जूनमध्ये सरासरी ४६५ मि.मी. पाऊस झाला आहे. सोमवारी जिल्ह्यात २९० मिलिमीटर पाऊस झाला. सर्वाधिक ९८ मि.मी. पाऊस इगतपुरीत, तर नांदगावमध्ये पावसाने दडी मारली. रविवारपासून सुरू असलेल्या पावसामुळे दिलासा मिळाला आहे.

नाशिक विभागात ९८.९३ टक्के पाऊस : नाशिकविभागात मान्सूनचा अातापर्यंत झालेला पाऊस समाधानकारक अाहे. साेमवारपर्यंत विभागात ९८.९३ टक्के पावसाची नाेंद झाली असून, गेल्या वर्षीच्या तुलनेत १०.०४ टक्के अधिक ऊस पडला अाहे. विभागातील पेठ तालुक्यात २५ टक्क्यांपेक्षा कमी पाऊस असून इतर ठिकाणी त्यापेक्षा अधिक पर्जन्याची नाेंद झाली अाहे. विभागात साेमवारपर्यंत नाशिक जिल्हयात ८०.४५ मिमी, धुळ्यात ११७.२५ मिमी, नंदुरबारमध्ये ११०.०३ मिमी. जळगांवमध्ये १०२.३५ मिमी, अहमदनगरमध्ये ८४.५७ मिमी पाऊस झाला. ही सरासरी १४.२२ टक्के असून गेल्या वर्षी जून महिन्यात ती अवघी ४.१८ टक्के हाेती.

४३० गावे तहानलेलीच :
विभागात पावसाची सुरूवात समाधानकारक असली, तरी ४३० गावे १४४९ वाड्या तहानलेल्याच अाहेत. येथे शासकीय खासगी अशा ४६८ टंॅकरव्दारे पाणीपुरवठा केला जाताे. नाशिक जिल्हयातील सिन्नर, नांदगांव, चांदवड, बागलाण, येवला, देवळा, सुरगाणा, मालेगांव, त्र्यंबकेश्वर, पेठ, दिंडाेरी इगतपुरी तालुक्यातील १५२ गावे २५९ वाड्यांना खासगी शासकीय अशा ११० टँकरव्दारे पाणी पुरवठा केला जात अाहे.अहमदनगरला ३४८, धुळ्यात ३, जळगांवमध्ये तर नंदुरबार जिल्हयात एक टँकर सुरु अाहे.

सोमवारी झालेला तालुकानिहाय पाऊस मि.मी.
नाशिक -३९.२, इगतपुरी-९८, दिंडोरी-१९, पेठ-७, त्र्यंबकेश्वर-४५, मालेगाव-२, नांदगाव-०.०, चांदवड-१५ , कळवण-७.२, बागलाण-३, सुरगाणा-७.४, देवळा- २.२, निफाड-६.२, सिन्नर-२६ , येवला -१३ नाशकात ७२.६ मि.मी.नाशिक शहरात सोमवारी रात्रीपर्यंत ४३ मिलिमीटर पाऊस पडला. मुख्य हंगामात म्हणजे ते २२ जूनपर्यंत एकूण ७२.६ मिलिमीटर पावसाची नोंद करण्यात आली आहे.
बातम्या आणखी आहेत...