आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

गुड न्यूज: एमबीए विद्यार्थ्यांना यंदा सर्वाधिक संधी...

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
नाशिक- ग्रॅज्युएट मॅनेजमेंट अॅडमिशन कौन्सिल या जगभरात काम करणाऱ्या संस्थेच्या माध्यमातून करण्यात आलेल्या सर्वेक्षणानुसार २०१५ मध्ये एमबीए झालेल्या विद्यार्थ्यांना नोकरीच्या सर्वाधिक संधी उपलब्ध होणार आहेत. गेल्या वर्षी ज्या विद्यार्थ्यांना नोकरीसाठी वणवण करावी लागली, त्यांना यंदा चांगल्या संधी उपलब्ध होणार असल्याचे या सर्वेक्षणावरून दिसून येते.
या संस्थेच्या वतीने युरोपियन फाउंडेशन ऑफ मॅनेजमेंट डेव्हलपमेंट आणि जगभरातील सगळ्या कॉर्पोरेट कंपन्यांमध्ये तसेच, ११३ बिझनेस स्कूलमध्ये करण्यात आलेल्या या सर्वेक्षणामध्ये हा निष्कर्ष निघाला आहे. या सर्वेक्षणानुसार ४७ देशांमध्ये विविध मल्टिनॅशनल कंपन्या यंदा नव्याने एमबीए विद्यार्थ्यांना संधी उपलब्ध करून देणार आहेत. ज्यामध्ये प्रामुख्याने भारतामध्ये व्यवस्थापन कौशल्य आणि व्यवस्थापन अभ्यास केलेल्या विद्यार्थ्यांना अधिक संधी मिळणार आहे. यामुळे एमबीए विद्यार्थ्यांना मिळणारा पगारदेखील नक्कीच वाढण्याची शक्यता आहे. या क्षेत्रात अनुभव असणाऱ्या विद्यार्थ्यांना विशेष संधीही दिल्या जाणार आहेत. तरी फ्रेशर विद्यार्थ्यांना यूएसएसारख्या देशामध्ये एक लाख रुपयांपर्यंत प्रतिमाह पगार मिळण्याची शक्यतादेखील या सर्वेक्षणात व्यक्त करण्यात आली आहे.
यामुळे येत्या वर्षात एमबीए केलेल्या विद्यार्थ्यांना तसेच, व्यवस्थापन क्षेत्रात अनुभव असणाऱ्या एमबीए विद्यार्थ्यांना परदेशगमनाच्या जास्तीत जास्त संधी उपलब्ध होतील, असे चित्र दिसत आहे. यासाठी विद्यार्थ्यांना फक्त अनुभवाच्या जोरावर काम मिळविण्यासाठी प्रयत्न करावे लागतील, असेही सांगण्यात आले आहे.
यावर्षी नोकरीच्या संधी वाढण्याचे कारण
गेल्यावर्षी कंपनी कॉस्ट कटिंगमुळे जास्तीत जास्त स्पेशलायझेशन असलेले पदवीधर विद्यार्थी कंपन्यांमध्ये घेतले जात होते. यावर्षी मात्र भारतासह भारताबाहेरील कंपन्यांमध्ये व्यवस्थापनाचा प्रश्न निर्माण होत आहे, ज्यासाठी व्यवस्थापन विषयात उत्तमरित्या काम करू शकणाऱ्या अनुभवी विद्यार्थ्यांची गरज भासणार आहे. यामुळे एमबीए करणाऱ्या विद्यार्थ्यांना नोकरीच्या चांगल्या संधी यंदा उपलब्ध होणार असल्याचे या सर्वेक्षणात स्पष्ट कण्यात आले आहे.
बातम्या आणखी आहेत...