आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

वालदेवीतील दूषित पाण्याने हजाराे मासे पडले मृत्युमुखी

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
सिडको - दाढेगाव,पिंपळगाव परिसरात वालदेवी नदीमध्ये बुधवारी (दि. ८) सकाळी हजाराे मासे मृतावस्थेत सापडले. दूषित पाण्यामुळे या माशांना जीव गमवावा लागल्याचे उघड झाल्यानंतर परिसरातील शेतकरी संतप्त झाले. या सर्व प्रकाराची शासनाने चौकशी करावी, अशी मागणी त्यांनी केली आहे.

वालदेवीच्या पाण्यावर अनेक प्रकारची िपके घेतली जातात. काही दिवसांपासून या नदीत पाणी नसल्यामुळे पात्र खोल गेले आहे. पात्रातून जाणारी नाल्याची लाईन फुटल्याने अनेक दिवसांपासून ते पाणी नदीच्या पाण्यात एकत्र होत असल्याचे शेतक-यांनी सांगितले. बुधवारी हे नाल्याच्या पाण्याचा माेठा लाेट नदीपात्रात घुसून त्या प्रदूषित पाण्यामुळे माशांना प्राण गमवावा लागला असल्याचा प्राथमिक अंदाज आहे. मात्र, एकाच वेळी इतक्या माेठ्या संख्येने मासे मृत झाल्याची घटना या भागात पहिल्यांदाच घडल्याचे शेतक-यांनी सांगितले. हे पाणी जर माशांच्या जिवावर बेतू शकते तर ते शेतीस वापरण्यासाठी किती धोकादायक असेल, याबाबत साशंकता निर्माण झाली असल्याचा आक्षेप घेत या प्रकाराची चौकशी करून संबंधितांवर योग्य ती कारवाई करण्याची मागणी करण्यात आली आहे.
चौकशी करून कठाेर कारवाई करावी
यासंपूर्ण प्रकाराची शासनाने चौकशी करावी. या घटनेला जबाबदार असलेल्यांवर कारवाई करावी. ही बाब अतिशय गंभीर असून, आज माशांचा जीव गेला, उद्या माणसांच्या जिवावर बेतू शकते. योगेशबोराडे, नागरिक
शेतीसाठी धोकादायक पाणी
हे पाणी शेतीसाठीही धोकादायक ठरू शकते. यात दूषित पाणी एकत्र झाल्याने हा प्रकार घडला. स्वच्छ पाणी तत्काळ सोडून हा प्रश्न सोडवावा. सुभाषभालके, नागरिक
वालदेवी नदीच्या पात्रात दाढेगाव, पिंपळगाव येथे मृतावस्थेत आढळलेले मासे.