आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

हजारावर नाशिककरांची गुजरातेत प्रचारकाची भूमिका, उद्याेजक-व्यावसायिकही सहभागी

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

नाशिक - जिल्ह्याच्या सीमेलाच लागून असलेल्या गुजरात विधानसभेची बहुचर्चित निवडणूक सध्या एेन भरात असून नाशिकमध्येही याची जाेरदार चर्चा जागाेजागी पहायला मिळत अाहे. शहरातून किमान दाेन हजार नागरिक सध्या गुजरातच्या वेगवेगळ्या भागात प्रचारकाच्या भूमिकेत असल्याचे पहायला मिळत अाहेत. यात उद्याेजक-व्यावसायिकांचाही समावेश अाहे. भाजपशी संबंधित एका उद्याेजकाने सुरत परिसरात चार दिवस घालवले असता, तेथे जीएसटी लागू झाल्यानंतर सुरुवातीला असलेला व्यावसायिकांमधील राेष अाता मात्र तितकासा जाणवत नसल्याचे सांगितले. 

 

देशात २०१४ च्या लाेकसभा निवडणूकीत ‘गुजरात माॅडेल’ चीच चर्चा सर्वत्र एेकायला मिळत हाेती, त्यावेळचे गुजरातचे मुख्यमंत्री नरेंद्र माेदी पंतप्रधानपदाकरीताचा चेहरा म्हणून समाेर ठेवला गेल्याने ही चर्चा स्वाभाविक हाेती. अाताही त्याच अनुषंगाने पंतप्रधान असलेल्या माेदींच्या गुजरातकडे पाहिले जात अाहे. यामुळेच भाजपच्या दृष्टीने ही निवडणूक प्रतिष्ठेची मानली जात अाहे. या निवडणुकीसाठी नाशिकमधून काही राजकीय पक्षांचे कार्यकर्ते अाणि नाळ जुळलेले व्यावसायिक, उद्याेजकही अहमदाबाद, बनासकांठा, भरूच, सुरत, भुज अादी भागात तळ ठाेकून अाहेत. काही प्रचार अाटाेपून नाशिकमध्ये परतले असून निवडणुकीच्या दाेन दिवस अगाेदर पुन्हा गुजरातला परतणार अाहेत. 

 

सरदार सराेवरचे पाणी, अखंडित वीजपुरवठा, दर्जेदार पायाभूत सुविधांचे दाखले देऊन ‘जेथे जेथे भाजप, तेथे तेथे विकास’ या मुद्द्यावर भाजप मतदारांना अाकर्षित करण्याचा प्रयत्न करीत अाहेत; तर भाजप दावे करीत असलेला विकास हा मात्र भ्रम निर्माण करण्याचा प्रयत्न अाहे, यावर काँग्रेस जाेर देत असल्याचे अहमदाबादला प्रचारात सहभागी असलेल्याएका व्यावसायिकाने सांगितले. जीएसटीबाबत नाराजी असली तरी ती पुर्वीइतकी राहिली नसल्याचे सुरत भागात प्रचार करणाऱ्या एका कार्यकर्त्याने सांगितले. तर जीएसटी, पाटीदार अांदाेलन, नाेटबंदी यामुळे सत्ताधाऱ्यांच्या जागा माेठ्या प्रमाणात कमी हाेतील, असा विश्वास एका कार्यकर्त्याने व्यक्त केला. 

बातम्या आणखी आहेत...