आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

म्हसरूळमध्ये दीड हजारावर मतदारांची नावे यादीतून गायब

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
म्हसरुळ येथील काही बूथवर संतप्त झालेल्या नागरिकांनी खुर्च्या ताेडल्या. तसेच रास्ता राेकाेही केला. - Divya Marathi
म्हसरुळ येथील काही बूथवर संतप्त झालेल्या नागरिकांनी खुर्च्या ताेडल्या. तसेच रास्ता राेकाेही केला.
नाशिक - एका बाजूला मतदान करण्याबद्दल जागृतीचे प्रयत्न झालेले असतानाही हजाराे मतदार मतदानाकरिता गेले खरे, पण मतदार यादीत नावच नसल्याने त्यांना मतदानाचा हक्क बजावता अाला नसल्याचा प्रकार म्हसरूळमध्ये घडला.
 
प्रभाग क्रमांक १ मध्ये म्हसरूळ गावठाण परिसराचा समावेश असून, परिसरातील जवळपास दीड हजार मतदारांची नावे मतदार यादीतून गायब झाल्याचा व हे गंभीर षड‌्यंत्र असल्याचा अाराेप करत मतदारांनी हातात अाेळखपत्र फडकावत घाेषणा दिल्या, यानंतर पाेहाेचलेल्या विभागीय निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांच्या गाडीलाही या संतप्त नागरिकांनी घेराव घालून सरकारच्या निषेधाच्या घाेषणा दिल्या व तेथेच गाडीत बसून मतदारांची नावे अाॅनलाइन शाेधण्याचा प्रयत्न कर्मचाऱ्यांनी केला, त्यात काही नावे थेट सिडकाे, सातपूरसारख्या इतर प्रभागात तर काहींची नावे सापडलीच नाही त्यामुळे हे मतदार मतदानापासून वंचितच राहिले.
 
पंचवटीतील सर्वच प्रभागांत मतदार यादीतून मतदारांची नावे मतदार यादीत नसणे, पतीचे नाव एका प्रभागात तर पत्नीचे दुसऱ्या प्रभागात काही ठिकाणी तर कुटुंबीयांचीच नावे यादीत नसणे अशा तक्रारी मतदार करीत हाेते. अनेक ठिकाणी तासन‌्तास मतदार अापली नावे मतदार याद्यांत चाळताना दिसत हाेते. म्हसरूळ गावासह वडनगर, लक्ष्मीनगर परिसरातील जवळपास दीड हजारावर मतदारांची नावेच मतदार यादीत नसल्याचे समाेर अाले. काही विशिष्ट भागातील नावे गायब असल्याने हे षड‌्यंत्र असल्याचा अाराेप नागरिकांनी केला.
 
हातात मतदार अाेळखपत्र असतानाही यादीत नावे नसल्याने मतदानाला मुकावे लागणार असल्याने नागरिकांचा संताप वाढत गेला. अखेर हे संतप्त लाेक रस्त्यावर उतरल्याने काहीकाळ तणावाची स्थिती निर्माण झाली हाेती. पाेलिसांनी चाेख बंदाेबस्त ठेवला हाेता, माजी मंत्री शाेभा बच्छाव, काँग्रेसचे शहराध्यक्ष शरद अाहेर  यांसारख्या काही नेत्यांनी समजूत घालण्याचा प्रयत्न केला, तरी मतदार शांत हाेत नव्हते, यात महिलांची संख्या माेठी हाेती.

झाेनल अधिकाऱ्याच्या गाडीत नावे शाेधण्याचा केविलवाणा प्रयत्न
यानंतर झाेनल अधिकारी येथे पाेहाेचले, त्यांच्या गाडीतच लॅपटाॅप अाणि माेबाइल अॅपद्वारे मतदारांची नावे शाेधण्याचे काम सुरू झाले. यावेळी या गाडीपुढे मतदारांची माेठी रांग लागली हाेती.
 
उमेदवार मात्र गायब 
मतदारांचा काही तास केंद्राबाहेर, दिंडाेरीराेडवर संताप सुरू असताना बाळासाहेब उखाडे वगळता एकही उमेदवार येथे बाजू मांडताना पहायला मिळाला नाही हे विशेष म्हणावे लागेल.
म्हसरुळ येथील काही बूथवर संतप्त झालेल्या नागरिकांनी खुर्च्या ताेडल्या. तसेच रास्ता राेकाेही केला.
बातम्या आणखी आहेत...