आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

व्यंगचित्र हे जगण्यातील विसंगती टिपणारे सशक्त माध्यम; हजार शब्द एक रेषा परिसंवादातील सूर

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
प्रसिद्ध व्यंगचित्रकार प्रशांत कुलकर्णी , सॅव्हिओ मॅस्केन्हास, अभिजीत किणी यांनी आपल्यातील व्यंगचित्रकला उलगडून दाखवताना या माध्यमाची आजच्या काळातील गरजही अधोरेखीत केली. - Divya Marathi
प्रसिद्ध व्यंगचित्रकार प्रशांत कुलकर्णी , सॅव्हिओ मॅस्केन्हास, अभिजीत किणी यांनी आपल्यातील व्यंगचित्रकला उलगडून दाखवताना या माध्यमाची आजच्या काळातील गरजही अधोरेखीत केली.

नाशिक- आदिमानवाने व्यक्त होण्यासाठी गुहेत चित्र काढली. मानवाच्या गुणसूत्रात चित्रकला आहे, असे हे माध्यम प्राचीन काळापासून चालत आले आहे. त्याला स्थित्यंतराचा इतिहास आहे. व्यंगचित्र सुपर हिरो तयार करतात कारण समाजाला अशा सुपर हिरोंची गरज असते. राजकारण असो की समाजकारण माणसाच्या जगण्यातील विसंगती टिपणारे माध्यम अत्यंत प्रभावी असून एक प्रतिमा हजार शब्दांचा अर्थ पोहचवणारे हे माध्यम सशक्त असल्याचा सूर हजार शब्द एक रेषा या परिसंवादात दिसून आला. प्रसिद्ध व्यंगचित्रकार प्रशांत कुलकर्णी , सॅव्हिओ मॅस्केन्हास, अभिजीत किणी यांनी आपल्यातील व्यंगचित्रकला उलगडून दाखवताना या माध्यमाची आजच्या काळातील गरजही अधोरेखीत केली. 

समाजाचा राग व्यवस्थेवर असतो हा राग व्यक्त करण्यासाठी व्यंगचित्रकार त्याला मदत करतो असे अभिजीत किणी यांनी सांगितले. अभिजीत किणी यांची ॲंग्री मावशी हे पात्र मुंबईतली सर्वसामान्य कोळीण महिला. हे सर्वसामान्य पात्र आहे व ती काॅमिक्समधून आपल्यापुढे सुपरमॅन, बॅटमॅन सारख्या सुपर हिरोप्रमाणे पोहचते व व्यवस्थेच्या विरोधात उभे राहते अशा मावशीच्या प्रवासाबद्दल किणी यांनी आपले मनोगत व्यक्त केले. 


सॅव्हिओ यांनी अमर चित्रकथेच्या माध्यमातून लोकशिक्षणाची गरज किती प्रभावी झाली याबद्दल सांगितले. स्वच्छ भारत मोहिमेचा संदेश काॅमिक्समधून पोहोचवल्याने जागृती झाली असेही वक्त्यांनी सांगितले. भारतीय वाचकांला आजपर्यंत पाश्चात्य सुपर हिरोंच्या गोष्टी वाचाव्या लागल्या पण आपल्या पुराणात राम, हनुमानासारखे सुपर हिरो आहेत. त्यांना काॅमिक्सच्या माध्यमातून पुढे आणण्याची गरज असल्याचे त्यांनी स्पष्ट केले. प्रसिद्ध व्यंगचित्रकार वसंत हळबे यांचे सुप्रसिद्ध काॅमिक्स पात्र शिकारी शंबू विषयी सांगितले. 1980 ते आताचा काळ या प्रवासात शिकारी शंबूच्यात बदल का करावे लागले याविषयी त्यांनी आपली भूमिका स्पष्ट केली. 


प्रशांत कुलकर्णी यांनी आपल्या राजकीय व्यंगचित्रकारितेमागची भूमिका व्यक्त करताना राजकीय व्यंगचित्रकारिता हे आव्हान असल्याचे सांगितले. त्यांनी त्याबदद्लचे काही अनुभव व आपली व्यंगचित्रे प्रेक्षकांपुढे सादर केली. सध्याचे जीवन अधिक गुंतागुंतीचे होत आहे त्यामुळे व्यंगचित्रकाराला अधिक जागरुक व्हावे लागते, याकडे त्यांनी लक्ष वेधले.
सध्याच्या देशांतील वातावरणामध्ये व्यक्तीस्वातंत्र्यावर बंधन येत असल्याबद्दल तिन्ही व्यंगचित्रकारांनी खंत व्यक्त केली. कार्यक्रमाच्या अखेरीस तिघांनी राइट टू डिसअॅग्री या कार्यक्रमाच्या थिमनुसार तीन व्यंगचित्रे काढून प्रेक्षकांना सुखद धक्का दिला व विचारात पाडले. या कार्यक्रमाचे सूत्र संचालन विकास सिंग यांनी केले.

व्यंगचित्राची राज ठाकरे, बाळासाहेब ठाकरे यांच्याकडून दखल
प्रशांत कुलकर्णी यांनी रमेश किणी यांच्या खून प्रकरणावेळी राज्यांत शिवसेनेविरोधात उभे राहिलेले वातावरण व त्यांवर त्यांनी त्यावेळी महानगरसाठी केलेले ब्रोकन ॲरो हे व्यंगचित्र याबाबतचा किस्सा सांगितला. शिवसेनेला वर्मी लागणारे व्यंगचित्र काढूनही त्याची दखल राज ठाकरे व बाळासाहेब ठाकरे यांनी कशी आवर्जुन घेतली व कसे कौतुक केले हे त्यांनी सांगितले.

पुढील स्लाईडवर फोटो आणि माहिती

बातम्या आणखी आहेत...