आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

त्र्यंबक नगरीत राज्याच्या कानाकोप-यातून वारकरी दाखल

10 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

त्र्यंबकेश्वर - संत निवृत्तिनाथ महाराजांच्या दर्शनासाठी विठ्ठल नामाच्या गजरात गावागावांमधून आठ ते दहा दिवसांपासून निघालेल्या दिंड्या मंगळवार संध्याकाळपासूनच त्र्यंबक नगरीत दाखल झाल्या. त्यामुळे बुधवारी सकाळपासूनच निवृत्तिनाथ समाधी मंदिरात दर्शनासाठी वारक-यांच्या रांगा लागल्या होत्या.
प्रतिवर्षाप्रमाणे परंपरेच्या दिंड्यांसह नवीन येणा-या दिंड्यांनी आपापल्या जागा निश्चित करून तंबू, पिण्याच्या पाणी व्यवस्थेसह भजन व कीर्तन व्यवस्थेची तयारी केली आहे. येणा-या वारक-यांसाठी पालिकेतर्फे पिण्याच्या पाण्याची व्यवस्था करण्यात आली आहे. मात्र, बुधवारी निवृत्तिनाथ मंदिरात दर्शनासाठी कोणतीही व्यवस्था नव्हती; तरीही वारकरी शांततेत दर्शन घेत होते.
ग्रामीण रुग्णालयातर्फे जादा कर्मचारी उपलब्ध करण्यात आले आहेत. कुशावर्त चौक, तहसील कार्यालय, मंदिर परिसरात वैद्यकीय पथकांची व्यवस्था करण्यात आली आहे व जिल्हा परिषदेमार्फत प्रदक्षिणा मार्गावरही आरोग्य व वैद्यकीय सुविधा उपलब्ध ठेवू, असे डॉ. भागवत व डॉ. जोशी यांनी सांगितले.
मेळा स्थानकात सुविधांचा अभाव - परिवहन मंडळाने आज जादा गाड्या सोडून भाविकांची सोय केली आहे. जव्हार फाट्यावरील सिंहस्थमेळा स्थानकावरून बस व्यवस्था असली तरी तेथे भाविकांना पिण्याचे पाणी व आरोग्य सुविधांची वानवा आहे व हे परिवहन मंडळाने अद्यापही प्रथेप्रमाणे टिकवून ठेवल्याचे चित्र आहे.
आले लॉजिंग बोर्डिंगचे स्वरूप - निवृत्तिनाथ समाधी मंदिराची देखभाल विश्वस्त मंडळ करते. वारक-यांच्या निवासासाठी मंदिरात मोफत व्यवस्था करण्यात आली आहे. भाविकांची सोय करण्याहेतू विश्वस्तांनी लोकवर्गणीतून खोल्या बांधल्या. त्यामुळे मंदिराला लॉजिंग-र्बोडिंगचे स्वरूप प्राप्त झाल्याची खंत भाविक व्यक्त करत आहेत.
जिथे जागा तिथे यात्रा - त्र्यंबकेश्वरच्या वाढत्या महत्त्वाच्या ओघात शहर विस्तारले. मात्र, त्याचे नियोजन राखण्यात आले नाही. आजघडीला पटांगणच शिल्लक नसल्याने ‘जिथे जागा तेथे यात्रा’ अशी अवस्था झाली आहे. पूर्वी आठ दिवस चालणारी यात्रा विविध कारणास्तव अनुक्रमे चार व नंतर दोन दिवसांची झाली. लाखोंनी भाविकांची संख्या वाढली. कालानुक्रम व लोकसंख्या वाढीचा परिणाम झाला असला तरी वारक-यांनी धार्मिक परंपरा, पायी दिंडी, भागवत पताका, तुळशीमाळ व ज्ञानेश्वरी ग्रंथपाठ निश्चित ठेवल्याने हा वारकरी संप्रदाय पुरातन काळापासून प्रसिद्ध झाला.
240 बसेसची व्यवस्था - परिवहन मंडळातर्फे 240 बसेसद्वारे पाच हजाराहून जादा फे-या करण्यात येतील. सिंहस्थ स्थानक ते सी. बी. एस. असा प्रवास मार्ग राहील, असे विभागीय नियंत्रकांनी सांगितले.