आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Thousands Of Sivasainikana Activist Oath For Loyalty

एकनिष्ठतेची शपथ हजारो शिवसैनिकांना

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

नाशिक- मुंबईतील सोमय्या मैदानात एकनिष्ठतेची शपथ घेण्यासाठी नाशिकमधून शिस्तबद्धरीत्या वीस हजारांहून अधिक शिवसैनिकांनी हजेरी लावली. घोटी टोलनाक्यावर प्रत्येक गाडीची व शिवसैनिकाची नोंदही ठेवण्यात आली.

गुरुवारी सकाळी 8 वाजता शालिमार येथील मध्यवर्ती कार्यालयातून शिवसैनिकांच्या गाड्या मुंबईकडे रवाना होऊ लागल्या. 1300 चारचाकी तर 62 बसेसमधून शिवसैनिकांना नेण्यात आले. शिवसेनेची महिला आघाडी, पोट संघटनांना आपापल्या पदाधिकारी व कार्यकर्त्यांचा समूह करून मुंबईत येण्यासाठी सांगितले गेले. नाशिक शहरातून साधारण 13 हजारांहून अधिक शिवसैनिक मुंबईला गेल्याचे पदाधिकार्‍यांनी सांगितले.

दरम्यान, घोटी टोलनाका येथे प्रत्येक वाहनाची नोंद करण्यात आली. शिवसेना कार्यालयातून घोटी टोलनाक्यावर शिवसैनिकांच्या वाहनांचे क्रमांक देण्यात आले होते. त्याप्रमाणे आलेल्या गाड्यांची नोंद करण्यात आली. तसेच, येथे उपमहानगरप्रमुख बाबा बच्छाव व शिवाजी भोर यांनीही प्रत्येक शिवसैनिकाची मोजणी केली. दरम्यान, नाशिकमध्ये आल्यानंतर कोणत्या भागातून किती पदाधिकारी व शिवसैनिक आले, ठरवलेल्या नियोजनाप्रमाणे शिवसैनिक आले की नाही, याचेही ऑडिट केले जाणार असल्याचे महानगरप्रमुख अजय बोरस्ते यांनी सांगितले.

शहरातही कार्यक्रम
बाळासाहेब ठाकरे यांच्या जयंतीनिमित्त शहरभरातही विविध कार्यक्रम घेण्यात आले. मुंबईतील कार्यक्रमासाठी मोठय़ा संख्येने शिवसैनिक गेल्यामुळे तुलनेत उत्साह कमीच होता.