आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

पोलिसाला जाळून मारण्याची धमकी

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
नाशिक - रिक्षामध्ये फ्रंटसीट नेणाऱ्या रिक्षाचालकावर कारवाई करणाऱ्या वाहतूक शाखेच्या पोलिस कर्मचाऱ्यास जाळून मारण्याची धमकी देत मारहाणीचा प्रकार रविवारी (दि. २६) सकाळी वाजता सावरकर चौक, इंदिरानगर येथे घडला. या प्रकरणी संशयित रिक्षाचालकाविरुद्ध इंदिरानगर पोलिसांत गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

संशयित रिक्षाचालक (रिक्षा क्र. एमएच १५, झेड ५७९६) नीलेश राजू सोनटक्के (रा. निसर्ग कॉलनी, पाथर्डी शिवार) दोन्ही बाजूने फ्रंटसीट बसवून नेत असताना वाहतूक शाखेचे कर्मचारी राजेश धुळे यांनी कारवाई केली. त्याचा राग आल्याने नीलेशने ‘तुला गणवेशाची गुर्मी आली आहे. भररस्त्यात जाळून मारून टाकील,’ अशी धमकी दिल्याची तक्रार धुळे यांनी दिली आहे. नीलेशवर सरकारी कामात अडथळा आणि जिवे मारण्याची धमकी दिल्याचा गुन्हा दाखल करून अटक करण्यात आली आहे. रिक्षाचालकांची दादागिरी वाढत असून, वाहतूक विभाग अधिकाऱ्यांना ते जुमानत नाहीत. पूर्वीच्या अधिकाऱ्यांचा जरब हाेता, त्यांना पुन्हा वाहतूक शाखेत घेण्याची मागणी पोलिस कर्मचाऱ्यांनी केली आहे.