नाशिक - म्हसरूळशिवारातील जागेचा ताबा मिळविण्यासाठी लष्करी जवानाकडून घरात शिरून जिवे मारण्याची धमकी दिल्याचा प्रकार दिंडोरीरोडवरील गजपंथ सोसायटीत घडला. या प्रकरणी संबंधित लष्करी जवानाविरुद्ध पंचवटी पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात अाला आहे.
शीतलकुमार पटणी (रा. गजपंथ सोसायटी) यांनी पोलिसांत दिलेल्या तक्रारीनुसार, म्हसरूळ शिवारातील सर्वे नंबर १२९ मधील जागा सोडून देण्यासाठी संशयित विजय पाटील (रा. निळवंडी, ता. दिंडोरी) यांनी घरात शिरून, जागा खाली करा, अन्यथा तुमच्या घरातील एकेकाला बघून घेताे. मी सैन्य दलात मेजर असून, पाेलिसही काही करू शकणार नाहीत, असे म्हणत शिवीगाळ करीत धक्काबुक्की केली. पंचवटी पाेलिसांनी पटणी यांच्या तक्रारीनुसार संशयित पाटील यांच्या विरोधात गुन्हा दाखल केला अाहे. दरम्यान, पटणी कुटुंबीयांनी पंचवटीपाठाेपाठ अाडगाव पाेलिसांतही संबंधिताविरुद्ध तक्रार दाखल केली आहे.
मंदिरातून८८ हजारांची चोरी
नाशिकराेड| विहितगावयेथील माधवनाथ महाराज मंिदराचा दरवाजा ताेडून चाेरट्याने शनिवारी मध्यरात्रीच्या सुमारास मंदिरातील चांदीच्या पादुका, विठ्ठल-रखुमाईच्या मुकुटासह चांदीची भांडी रोकड असा ८८ हजारांचा ऐवज लांबविला. मंदिराचे पुजारी बाळकृष्ण काशीनाथ जाेशी (७३) यांनी उपनगर पाेलिसांत दिलेल्या तक्रारीनुसार अज्ञात चाेरट्यांनी मध्यरात्री मंदिराचा दरवाजा ताेडून मंदिरात प्रवेश केला आणि सोन्या-चांदीच्या वस्तूंसह रोकड लांबविली. उपनगर पाेलिसांत गुन्हा दाखल करण्यात अाला अाहे.