आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

कार झाडावर आदळून तीन ठार, दोन गंभीर; मृतांत रिपाइं महिला पदाधिकारी प्रीती भालेराव

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
नाशिकरोड- परिसरातील शिखरेवाडी येथील अंधशाळा बसथांब्याजवळ रस्त्यामधील एका झाडावर कार आदळून झालेल्या भीषण अपघातात तीन जागीच ठार तर दोन गंभीर जखमी झाले. मृतांमध्ये रिपाइं पदाधिकारी महिलेचा समावेश आहे. रात्री ११ च्या सुमारास हा अपघात झाला. 

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार रिपाइंच्या पदाधिकारी प्रीती भालेराव, पूजा भोसले अन्य तिघे कारने (एमएच ०१, एई २४३६) जात होते. त्यांची रेनाॅल्ट कार कार शिखरेवाडी येथील अंधशाळा बसथांब्याजवळ रस्त्यामध्ये असलेल्या एका झाडावर जाऊन आदळली. या भीषण अपघातात प्रीती भालेराव, पुजा भोसले एका युवकाचा जागीच मृत्यू झाला. दोघे गंभीर जखमी झाले असून त्यांना उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.
बातम्या आणखी आहेत...