आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

शहरात तासाभरात तीन सोनसाखळी लुटीच्या घटना

9 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

नाशिक - शहरात सोनसाखळी चोरी आणि तोतया पोलिसांकडून लूटमारीचे सत्र सुरूच असताना शुक्रवारी दुपारी सव्वा चार ते साडेपाच वाजेच्या तासाभराच्या कालावधीत नाशिक-पुणे रस्त्यालगत एकापाठोपाठ सलग तीन घटनांमध्ये लूटारूंनी महिलांच्या गळ्यातील सोनसाखळी हिसकावून पळ काढला.

याघटनांमध्ये सुमारे दोन लाखांचे दागिने लांबविले असून चोरट्यांनी वृद्ध दांम्पत्यास मारहाण केल्याने दहशत वातावरण निर्माण झाली आहे. पहिली घटना काठेगल्ली परिसरात घडताच संबंधित वृद्धांनी तातडीने भद्रकाली पोलिसांना मोबाईलद्वारे घटना कळविली. त्यानुसार पोलिसांनी वायरलेसवर सर्वच पोलिस ठाण्यांना माहिती दिली. तरीही तासाभराच्या आत थोड्याच अंतरावर दुसरी आणि लागलीच तिसरीही घटना घडल्याने पोलिस यंत्रणेला खुले आव्हान देत त्यांच्या नाकावर टिचून सुमारे दीड ते दोन लाखांचे सोने लूटण्यात चोरटे यशस्वी झाले. याघटनांनी पोलिसाच्या गस्त, नाकेबंदीवर प्रश्न उपस्थित होत असून सोनसाखळी लूटीने महिलांमध्ये भितीचे वातावरण निर्माण झाले आहे.

तीनही घटनेतील चोर एकच

या तीनही घटनेतील तक्रारदारांनी सोनसाखळी लूटारूचे केलेले वर्णन एकसारखेच आहे. त्यातनुसार लुटारुच्या कानात बाळी, मोठे केस, गोरा चेहरा, मजबूत शरीरयष्ठीचे दोघे युवक होते, असे तक्रारदारांकडून सांगण्यात आले.
अशा घडल्या घटना
घटना पहिली ठिकाण : काठेगल्ली, त्रिकोणी गार्डन
येथील कोकिळा रोहीदास चौधरी(62) या पतीसमवेत घराजवळून दूध घेऊन जात असताना मागून पल्सरवरून आलेल्या दोघांनी अंगावर भरधाव वेगाने दुचाकी नेताच दोघे बाजूला झाले. ते काही बोलण्याच्या आत लूटारूनी धक्काबुक्की करीत महिलेच्या गळ्यातील 70 हजार रुपयांची सोनसाखळी हिसकावून पळ काढला. भद्रकाली पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला.
घटना दुसरी
वेळ : दुपारी 4:30 ठिकाण : टागोरनगर
येथील मनिषा संजय पाटील या पाटबंधारे सोसायटीजवळून जात असतानाच पल्सरवरूनच मागुन आलेल्या दोघांनी पाटील यांना काही कळण्याच्या आतच त्यांच्या गळ्यातील 10 हजाराची सोनसाखळी हिसकावून पळ काढला.
घटना तिसरी
वेळ : दुपारी 4:40 ठिकाण : नाशिक-पुणे रोड, दत्तमंदिर सिग्नल
येथील रामनगर हौसिंग सोसायटीत राहणारे विर्शांती बाबूराव शिंदे(66) व त्यांचे पती (71) हे दोघे घरासमोरच उभे असताना पल्सरवरून आलेल्या युवकाने दोघांना मारहाण करीत महिलेच्या गळ्यातील 4 तोळे वजनाची 75 हजाराची पोत हिसकावून तो पसार झाला.

लुटारू घरात घुसतील

सोनसाखळी चोरटे भरवस्तीत, गर्दीच्या ठिकाणांहून महिलांच्या अंगावर हात टाकून सोनसाखळ्या लांबवित असतानाच आता तर थेट घराच्या आवारात अंगणात येऊन लूटमार करू लागले आहेत. पोलिसांनी वेळीच कारवाई न केल्यास ते घरात घुसून लूटमार करतील, यावरून पोलिस नेमके काय करतात? प्रा. किशोर शिंदे, तक्रारदार