आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

तीन रुग्णालयांची साेनाेग्राफी यंत्रे ‘सील’, गर्भलिंग निदान प्रकरणी पालिकेचा दणका

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
नाशिक - स्त्रीभ्रूण हत्या थांबविण्यासाठी महापालिकेने माेहीम हाती घेतली असून, याच माेहिमेचा भाग म्हणून शहरातील तीन बड्या रुग्णालयांची साेनाेग्राफी यंत्रे वैद्यकीय विभागाने सील केली अाहेत. गर्भलिंग निदान कायद्याचे उल्लंघन केल्याचा संबंधितांवर ठपका असून, संबंधितांचे खुलासे असमाधानकारक असल्यामुळे त्यांच्यावर कारवाई केल्याची माहिती वैद्यकीय विभागाने जारी केली अाहे.

पंतप्रधान नरेंद्र माेदी यांच्या अावाहनानुसार जिल्ह्यात ‘बेटी बचाव, बेटी पढाअाे’ या उपक्रमाची जाेमाने अंमलबजावणी केली जात अाहे. त्याबराेबरच गर्भधारणा वा प्रसूतीपूर्व गर्भलिंग निदान प्रतिबंध अधिनियम २००३ चीही अंमलबजावणी सुरू अाहे. याच माेहिमेंतर्गत साेनाेग्राफी यंत्राचा दुरुपयाेग हाेणार नाही याची तपासणी केली जाते. त्यासाठी दर दाेन महिन्यांनी सल्लागार समितीची सभा हाेत असून, अाॅक्टाेबर २०१५ मध्ये पालिका क्षेत्रात तीन साेनाेग्राफी सेंटरमध्ये गैरप्रकार सुरू असल्याचे लक्षात अाले. त्यानंतर संबंधितांना कारणे दाखवा नाेटीस बजावण्यात अाली. या नाेटिसांच्या अनुषंगाने संबंधितांचा खुलासा असमाधानकारक असल्यामुळे १७ डिसेंबर राेजी सल्लागार समितीवर अहवाल ठेवून पुन्हा म्हणणे मांडण्यासाठी संबंधितांना बाेलावण्यात अाले. मात्र, अंतिम सुनावणीतही समाधानकारक उत्तर मिळाल्यामुळे अखेर रुग्णालयातील साेनाेग्राफी यंत्र सील करावे, असे अादेश वैद्यकीय अधीक्षक बी. अार. गायकवाड यांनी दिले. यापूर्वी सात प्रकरणांत अशीच कारवाई करून न्यायालयीन प्रक्रिया सुरू झाली अाहे. या तिन्ही प्रकरणांत न्यायालयीन प्रक्रिया केली जाणार अाहे.

..ही अाहेत रुग्णालये
>डाॅ. रणजित एन. मेहता, कुलकर्णी काॅलनी, शरणपूरराेड
>डाॅ. रणजित थत्ते, कुलकर्णी काॅलनी, शरणपूरराेड
>डाॅ. सुरेखा भानुदास गुंडरे (येनगे), श्री बालाजी हाॅस्पिटल, दत्त मंदिर स्टाॅप, सिडकाे