आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

तीन तासांचा खल, तडजाेड निष्फळ

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
नाशिक - गेल्या अाठवड्यात महापालिका मुख्यालयात भरलेल्या रात्रीच्या दरबारातील तीनपैकी दाेन वादग्रस्त विषयांना स्थायी समितीने साेमवारी हिरवा कंदील दाखवला खरा, मात्र ३३०० सफाई कर्मचाऱ्यांच्या टक्के जादा दराच्या ठेक्याला कशापद्धतीने मंजुरी द्यायची, यावरून तब्बल तीन तास खल सुरू हाेता. दरम्यान, अायुक्त बैठकीला अनुपस्थित असल्याचे कारण देत स्वत:ला डाग लावून घेण्याएेवजी त्यांच्या उपस्थितीत साेक्षमाेक्ष लावण्याची तडजाेड करीत प्रस्ताव तात्पुरता तहकूब करण्यात अाला. एकीकडे दुपारी वाजेपासून तर वाजेपर्यंत अधिकारी सभागृहात तळ ठाेकून असताना, दुसरीकडे मात्र अायुक्तांपासून तर स्थायी समिती सभापतींपर्यंत वजनदार सदस्यांचे ‘रामायण’ येथे गुफ्तगू सुरू हाेते. विशेष म्हणजे, महापाैर अशाेक मुर्तडक यांच्यासह सत्ताधारी पक्षाचे बहुतांश पदाधिकारीही येथे हजर असल्यामुळे संबंधित प्रस्तावांचे ‘वजन’ चांगलेच अधाेरेखित झाले.

‘दिव्य मराठी’ने महापालिकेत मध्यरात्रीपर्यंत रंगलेल्या दरबारातील वादग्रस्त विषयांवर प्रकाश टाकला हाेता. स्थायी समितीच्या बैठकीसाठी जादा विषयात हे प्रस्ताव टाकण्यासाठी प्रशासनातील काही अधिकाऱ्यांनी रात्री उशिरापर्यंत महापालिकेत ठाेकलेला तळ तडजाेडीसाठी जमलेल्या ठेकेदारांचे स्थायी समिती सभापतींसह सदस्यांनीच केलेल्या स्टिंग अाॅपरेशनचे वृत्त प्रसिद्ध झाल्यावर चांगलीच खळबळ उडाली हाेती. दरम्यान, या तिन्ही वादग्रस्त प्रस्तावांना मंजुरी देण्याची भूमिका घेत अभ्यास करून निर्णय घेण्याचे अादेश सभापतींनी दिले हाेते. त्यानुसार, या प्रस्तावांना मंजुरीसाठी देण्यासाठी साेमवारी दुपारी वाजता स्थायी समितीची सभा लावण्यात अाली. प्रत्यक्षात एक काय, परंतु तीन वाजून गेले तरी सभा सुरू हाेण्याचे नावच नव्हते. सभेसाठी दुपारी वाजेपासून सर्व खातेप्रमुख हजर हाेते. एवढेच नव्हे, तर सभापतींच्या दालनात सदस्यही ठाण मांडून हाेते. महत्त्वाच्या विषयांचे काय करायचे, याबाबत तडजाेड करण्यासाठी गुप्त ठिकाणी बैठक सुरू असल्याचे सांगितले हाेते. दरम्यान, तीन वाजेनंतर स्थायीची बैठक सुरू झाली. यात घंटागाडी ठेक्याला मुदतवाढ अग्निशामक दलासाठी रेस्क्यू व्हॅन खरेदीच्या प्रस्तावाला मंजूर करण्यात अाले.

‘स्थायी’च्या बैठकीवेळी अधिकाऱ्यांना सभापतींसह अनेकांची प्रतीक्षा करावी लागली. दुसरीकडे महापौरांसह स्थायीचे सभापती शिवाजी चुंभळे, अायुक्त डाॅ. प्रवीण गेडाम, नगरसचिव डी. एन. जुन्नरे यांच्यासह काही वजनदार पदाधिकारी नगरसेवकांचा ‘रामायण’वर खल सुरू होता. शेजारील छायाचित्रात ‘रामायण’ येथे उभी असलेली वाहने.

स्थायी समिती सभेच्या सुरुवातीलाच सभापतींनी अाक्रमक पवित्रा घेत सभेत गाेंधळ घालू नका, एकावेळी एकानेच बाेला, दुसऱ्यावर खाेटे अाराेप करण्यापूर्वी काेण किती धुतल्या तांदळासारखे अाहे, याचे परीक्षण करावे येथे काेणी चाेरी करीत नाही, असे फटकारले. त्यावर प्रा. कुणाल वाघ, ललिता भालेराव यांनी अाक्षेप घेत नेमके चाेर काेण, हे स्पष्ट करा तसेच अाम्हाला उद्देशून चाेर बाेलताय काय, असे प्रतिप्रश्न केले. त्यानंतर जादा विषयांना हरकत घेणारे राहुल दिवे कुणाल वाघ यांचे पत्र वाचत इतिवृत्तातील नियमबाह्य विषय वगळले नाही तर न्यायालयात दाद मागण्याचा इशारा दिला. त्यानंतर सभापतींनी पाच जणांचा विराेध नाेंदवून संबंधित विषयाला मंजुरी दिली.

सफाई कर्मचाऱ्यांचा तात्पुरता ठेका दिला तर महापालिकेचे काेटी खर्च हाेणार असून, हेच काम स्थानिक मेहतर मेघवाळ समाजातील लाेकांना दिले तर काेटी खर्च हाेईल स्थानिकांना बळ मिळेल, अशी मागणी स्थायी समिती सभापतींकडे करण्यात अाली. वादग्रस्त ठेका मंजूर करू नये, यासाठी माेठ्या संख्येने अांदाेलकही जमले हाेते. यावेळी सुरेश दलाेड, सुरेश मारू यांच्यासह पदाधिकारी उपस्थित हाेते. नाशिक महापालिका ‘ब’ दर्जाची असल्यामुळे मानधनावर तात्पुरती सफाई कर्मचाऱ्यांची भरती करावी, अशीही मागणी करण्यात अाली. दरम्यान, सत्ताधारी मनसे असताना परप्रांतीयांना ठेका देण्यासाठी धडपडीकडेही लक्ष वेधण्यात अाले.

सफाई कर्मचाऱ्यांचा ठेका वादग्रस्त ठरेल त्यामुळे उगाच अापल्याला डाग लागू नये यासाठी अाता अायुक्तांच्या खांद्यावर बंदूक ठेवण्याच्या हालचाली सुरू झाल्या अाहेत. ३५ टक्के जादा दराचे काम करणे किती सयुक्तिक अाहे, हे अायुक्तांकडूनच वदवून घेऊन अापण केवळ सिंहस्थाची तातडीने असल्यामुळे मंजुरी दिली, असा बचावात्मक पवित्रा घेतला जाणार अाहे. मंगळवारी स्थायी समितीची सकाळी १० वाजता बैठक हाेणार असून, यावेळी सफाई कर्मचाऱ्यांच्या ठेक्याचा विषय मंजूर केला जाणार असल्याचे समजते. तत्पूर्वी ठेका रद्द करा स्थानिकांना राेजगार द्या, अशी मागणी करणाऱ्या अांदाेलकांनाही काम देण्याचे अाश्वासन देऊन पडदा पाडायचा, अशीही रणनीती अाखली गेल्याचे सांगितले जाते.

एकीकडे ‘रामायण’ येथे खल सुरू असताना, तिकडे स्थायी समितीच्या सदस्यांनी विराेधाचे हत्यार उपसले हाेते. सभापती महापालिकेत दाखल झाल्यानंतर सदस्यांशी विचारविमर्श करण्यासाठी पुन्हा अर्धा तासाहून अधिक काळ ‘खर्च’ झाला. वास्तविक महापालिकेत दाखल झाल्यानंतर अायुक्त स्थायी समिती सभागृहाकडे अाले, मात्र काही पावलांच्या अंतरावर त्यांनी अचानक विचार बदलत बैठकीला जाण्याचा इरादा रद्द केला. यावेळी त्यांची सभापती चुंभळे यांच्याबराेबर चर्चादेखील सुरू हाेती. त्यामुळे पुन्हा चर्चांना पेव फुटले. स्थायी समिती सभापतींनी अायुक्तांना पुन्हा विभागीय अायुक्तालयातील बैठकीसाठी बाेलावणे अाल्याचे कारण देत सारवासारवही केली.

‘रामायण’ येथे झालेल्या प्रदीर्घ चर्चेत शिजले काय?
तब्बलदाेन तासांहून अधिक काळ बैठक लांबत असताना पत्रकार, तसेच अांदाेलकांचा किल्ला लावून धरण्यासाठी स्थायीतील काही वजनदार सदस्य खुमासदार कारणे सांगत वेळ मारून नेत हाेते. कधी अायुक्त व्हिडिअाे काॅन्फरन्सिंगमध्ये नाशिकराेडला अडकले, तर कधी सभापती निवडणूक प्रचार अाटाेपून येत असल्याची कारणे देत उभयतांच्या नावाने शिमगा केला जात हाेता. प्रत्यक्षात महापालिकेला लागूनच असलेल्या महापाैरांच्या ‘रामायण’ या निवासस्थानी मात्र स्थायी समिती सभापती शिवाजी चुंभळे, अायुक्त डाॅ. प्रवीण गेडाम, नगरसचिव डी. एन. जुन्नरे यांच्यासह काही वजनदार पदाधिकारी नगरसेवक उपस्थित हाेते. विशेष म्हणजे, महापाैर अशाेक मुर्तडक हेदेखील या वेळी तेथे उपस्थित असल्यामुळे त्यांच्या दालनात नेमके काय शिजतेय याविषयी उत्सुकता वाढली हाेती. येथे झालेल्या प्रदीर्घ चर्चेनंतर अायुक्त डॉ. गेडाम आणि सभापती चुंभळे दाेघेही बाहेर निघाले एकाच वाहनात बसून महापालिकेत दाखल झाले. त्यामुळे ‘रामायण’वरील बैठकीचे नेमके प्रयोजन काय आणि त्या बैठकीला मोजकेच महत्त्वाचे अधिकारी आणि पदाधिकाऱ्यांची असलेली उपस्थिती याबाबत महापालिकेत चर्चा रंगली होती.

रात्रीच्या दरबारावर ‘दिवें’चा प्रकाश
महापालिकेतगेल्या मंगळवारी (दि. २३) मध्यरात्री झालेल्या दरबारावर स्थायी समितीचे सदस्य राहुल दिवे यांनी सोमवारच्या सभेत प्रकाश टाकला. अग्निशामक दलाच्या जवळपास ४० ते ५० टक्के जादा दराच्या वादग्रस्त ठरलेल्या निविदा मंजुरीसाठी काही जणांचा घाट सुरू हाेता. अचानक स्टिंग अाॅपरेशन सुरू झाले. ठेकेदार पळाल्याचे सांगत त्यामुळे किमान टक्क्यांपर्यंत निविदेचा दर कमी तरी झाला, असाही युक्तिवाद केला. त्यासाठी अायुक्तांना धन्यवाद देता अशा प्रकरणात अधिकारी जास्तीत जास्त दाेन ते तीन टक्क्यांची तडजाेड करतात, असे सांगत ठेकेदार अधिकाऱ्यांमधील रिंगकडेही लक्ष वेधले.
बातम्या आणखी आहेत...