आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

कुऱ्हाडीचे घाव घालून अाजाेबांसह तिघांची हत्या; माथेफिरूच्या तावडीतून दाेघे सुदैवाने बचावले

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
नांदगाव - ‘दोम दोम दावलशा बाबा’ अशा त्वेषाने घोषणा देत रवींद्र पोपट बागूल (२८) या मानसिक संतुलन बिघडलेल्या तरुणाने साेमवारी हिंगणे (ता. नांदगाव, जि. नाशिक) गावात अापल्या अाजाेबांसह इतर दाेघांची कुऱ्हाडीचे घाव घालून निर्घृण हत्या केली. हातात कुऱ्हाड घेऊन रस्त्याने दिसेल त्याच्या डोक्यात घाव घालत सुटलेल्या माथेफिरूच्या तावडीतून सुटका करून घेत दोन जणांनी जीव मुठीत धरून पळ काढला. परिसरातील युवकांनी धाडस दाखवत मारेकऱ्याला पकडले नसते तर आणखी काही जणांना आपले प्राण गमवावे लागले असते. नांदगाव पोलिसांनी 
 
घटनास्थळावरून संशयिताला ताब्यात घेतले अाहे  
मारेकऱ्याचा भाऊ प्रवीण बागूल याने दिलेल्या माहितीनुसार, अाराेपी रवींद्र हा भिवंडी येथे खासगी कंपनीच्या वाहनावर चालक होता. रवींद्र, त्याची पत्नी आणि प्रवीण हे तिघेही तेथेच वास्तव्यास होते. मागील आठवड्यात गराेदर पत्नीला घेऊन रवींद्र हिंगणे येथे आई आणि आजोबांकडे आला. गेल्या काही दिवसांपासून रवींद्र वेड्यासारखा करायचा म्हणून कुटुंबीयांनी त्याला गुजरातमधील एका मांत्रिकाकडे नेले हाेते. सोमवारी सायंकाळी पुन्हा वेड्यासारखा करायला लागला. ‘दोम दोम दावलशा बाबा’ अशा आरोळ्या ठोकायचा. काका भावराव यांनाही त्याने लाथ मारल्याने ते लांब जाऊन पडले हाेते.  साेमवारी सकाळी साडेसहा वाजता भावाच्या किंचाळण्याने प्रवीणला जाग अाली. ‘रवींद्र पुन्हा वेड्यासारखा पळत आमच्याकडे अाला. तू असे का करताेस असे विचारले पण त्याने उत्तर दिले नाही. थोड्या वेळाने त्याने घरातील कोपऱ्यात पडलेली कुऱ्हाड उचलून अंगणात उभ्या असलेल्या आजोबा  केशव कचरू बागूल (६५) यांच्या डोक्यात घाव घातला. मी अडवायला गेल्यावर कुऱ्हाड घेऊन माझ्याही मागे लागला असता मी लपून बसलाे. त्याचा रुद्रावतार पाहून परिसरातील सर्व रहिवाशांनी घरे बंद करून घेतली,’ असे प्रवीण याने सांगितले.    
 

अाजाेबांचा खून केल्यानंतर रवींद्र कुऱ्हाड घेऊन रस्त्यावर अाला हाेता.  दुचाकीवरून जाणारे सुभाष भीमाजी बच्छाव (५०) यांच्याही डोक्यात त्याने कुऱ्हाडीचा घाव घातला, तेही रक्ताच्या थारोळ्यात पडले. यानंतर शेतात चाललेले विक्रम मंगू पवार (६०) यांच्याही डोक्यातही त्याने कुऱ्हाड घातली. आणखी दोन अनोळखी व्यक्तींच्या मागे लागला होता, पण त्यांनी पळ काढल्याने वाचले. काही धाडसी तरुणांनी त्याला पकडून चोप देऊन पोलिसांच्या स्वाधीन केले.
 
पत्नी ७ महिन्यांची गराेदर   
रवींद्रचा तीन वर्षांपूर्वी कंधारी (ता. भुसावळ) येथील विद्याशी विवाह झाला होता. भिवंडी येथे  तो भाऊ प्रवीण बागूल यांच्यासोबत वास्तव्यास होता. त्याच्या पहिला मुलाचे निधन झाले अाहे. पत्नी विद्या सात महिन्यांची गरोदर आहे.
 
बातम्या आणखी आहेत...