आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

तीन नवीन रेल्वेगाड्या

10 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

नाशिकरोड - मध्य रेल्वेने नाशिकरोडमार्गे तीन विशेष रेल्वेगाड्या सुरू करण्याचा निर्णय घेतला आहे. लोकमान्य टिळक ते दरभंगा एक्स्प्रेस, छत्रपती शिवाजी टर्मिनस ते जबलपूर व लोकमान्य टिळक ते संत्रागाची या विशेष गाड्यांचा समावेश असून, यापैकी लोकमान्य टिळक टर्मिनस ते दरभंगा एक्स्प्रेस रविवार(दि. 29)पासून धावणार आहे.

दरभंगा एक्स्प्रेस
लोकमान्य टिळक टर्मिनस (एलटीटी, मुंबई) ते दरभंगा एक्स्प्रेस (बिहारकडे जाणारी) 29 सप्टेंबर ते 1 डिसेंबर दरम्यान दर रविवारी लोकमान्य टिळक टर्मिनस (मुंबई) वरून दुपारी 2.30 वाजता सुटणार आहे. तर कल्याण, नाशिकरोड (6.20), मनमाड, भुसावळ, खंडवा, इटारसी, परिया, जबलपूर, कटनी, सतना, मुगलसराय, बक्सर, अररिया, पटना, बरोणी, जमशेतपूर असा प्रवास करून दरभंगा येथे रात्री 11.45 वाजता ही गाडी पोहोचणार आहे. तर परतीच्या प्रवास करताना दरभंगा येथून दर शुक्रवारी रात्री 8.20 मिनिटांनी ही गाडी सुटणार असून, सर्व स्थानकांवर थांबे घेऊन नाशिकरोड (2.15) मार्गे लोकमान्य टिळक टर्मिनस येथे सायंकाळी 6.05 वाजता पोहोचणार आहे. रविवार(दि. 29)पासून ही गाडी धावणार आहे.

संत्रागाची एक्स्प्रेस
लोकमान्य टिळक टर्मिनस ते संत्रागाची एक्स्प्रेस 11 ऑक्टोबर ते 29 नोव्हेंबरदरम्यान धावणार आहे. दर शुक्रवारी एलटीटीवरून 00.45 वाजता सुटून कल्याण, इगतपुरी, नाशिकरोड, मनमाड, भुसावळ, अकोला, बडनेरा, वर्धा, नागपूर, गोदिंया, दुर्ग, रायपूर, बिलासपूर, रुरकेला, चक्रधरपूर, टाटानगर, खरगपूर हे थांबे घेत संत्रागाचीला शनिवारी 8 वाजता पोहोचेल. तर बुधवारी संत्रागाचीवरून सायंकाळी 6.05 वाजता सुटून 13.35 वाजता लोकमान्य टिळक टर्मिनसवर पोहोचेल. दोन्ही बाजूने तेच थांबे आहेत. परतीच्या प्रवासासाठी 9 ऑक्टोबर ते 27 नोव्हेंबरदरम्यान ती धावेल.

जबलपूर एक्स्प्रेस
छत्रपती शिवाजी टर्मिनस ते जबलपूर एक्स्प्रेस 6 ऑक्टोबर ते 1 डिसेंबरदरम्यान धावणार आहे. दर रविवारी मुंबई येथून दुपारी 3.30 वाजता सुटून दादर, कल्याण, इगतपुरी, नाशिकरोड (16.55), मनमाड, जळगाव, भुसावळ, खंडवा, हरदा, इटारसी, परिया, गडरवा, नरसिंगपूरमार्गे जबलपूरला 6 वाजता पोहोचेल. शनिवारी जबलपूर येथून 19.30 वाजता सुटून वरील सर्व थांब्यांवर थांबत नाशिकरोड (7.45) मार्गे मुंबईला 12.15 वाजता पोहोचेल.