आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

सासे खूनप्रकरणी तिघे अटकेत; भद्रकाली पोलिसांची कारवाई

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
नाशिक- एन.डी. पटेलरोडवर झालेल्या शैलेश सासे या युवकाच्या खूनप्रकरणी पाेलिसांनी तीन संशयितांना अटक केली. शुक्रवारी रात्री काठेगल्ली परिसरात भद्रकाली पोलिसांनी ही कारवाई केली. संशयितांनी किरकोळ कारणातून खून झाल्याचे पोलिसांना सांगितले.
गेल्या रविवारी (३१ मे) शैलेशचा खून झाला होता. पोलिस आयुक्तांनी अचानक राबविलेल्या कोम्बिंग ऑपरेशनमध्ये भद्रकाली पोलिसांनी संतोष कोटकर (वय २१), अक्षय युवराज पाटील (१९) जुनेद चौधरी (१९) यांना ताब्यात घेतले. त्यांच्या मोबाइलचे लोकेशन संशयास्पद असल्याचे तपासात निष्पन्न झाले. सिगारेटचा धूर अंगावर आल्याच्या क्षुल्लक कारणातून धारदार चॉपरने वार करून हा खून करण्यात अाला होता. संशयित फरार होते. सहायक आयुक्त सचिन गोरे, वरिष्ठ निरीक्षक मधुकर कड, एपीआय वाल्मीक पाटील, वाळू लभडे, विजू लोंढे यांच्या पथकाने ही कारवाई केली.