आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

दरोड्याच्या तयारीतील तिघे शस्त्रांसह जेरबंद; सिन्नर फाट्याजवळ पकडले

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

नाशिकरोड- सिन्नर फाटा परिसरात दरोड्याच्या तयारीत असलेल्या तीन दरोडेखोरांना शुक्रवारी पहाटे 3.15 वाजेच्या सुमारास शस्त्रांसह जेरबंद करण्यात पोलिसांना यश आले. मात्र, दोघे अंधाराचा फायदा घेऊन पसार झाले.

यामध्ये सुरेश ऊर्फ पिंट्या पांडुरंग सोनवणे (33, रा. अरिंगळे मळा, एकलहरे रोड), ज्ञानेश्वर शिवाजी गायकवाड (19, रा. बालाजीनगर, मोरे मळा) व विलास विजय आहिरे (21, रा. मोरे मळा, जेलरोड) या तीन संशयितांना अटक करण्यात आली असून, रिझवान अमनउल्ला खान (रा. भालेराव मळा) व रतन पवार (रा. एकलहरे) हे दोघे पळून जाण्यात यशस्वी झाले. उपनिरीक्षक अरविंद केकान यांच्या मार्गदर्शनाखाली गुन्हे शोध पथकातील चंद्रकांत माळोदे, कय्युम सय्यद, काळे व साळुंखे हे गस्त घालत असताना सिन्नर फाटा मार्केट यार्डच्या गेटलगत संशयित दिसले. पोलिसांची चाहूल लागताच त्यांनी पळ काढला. पोलिसांनी पाठलाग करून नाशिक बाजार समिती परिसरात तिघांना ताब्यात घेतले, तर दोघे पळून गेले. पोलिसी खाक्या दाखवताच त्यांनी दरोड्याच्या तयारीत असल्याची कबुली दिली. झडतीत छर्‍यांची लोखंडी पिस्तूल, तलवार, कोयता, फावड्याचा दांडा ही हत्यारे व मिरची पूड मिळाली. त्यांच्याविरुद्ध नाशिकरोड पोलिसांत गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

बडदेनगरला तिघांना पकडले : बडदेनगर येथील सपना टॉकीजमागे दरोड्याच्या तयारीतील संजीवन गमरे (शास्त्रीनगर, ठाणे), प्रमोद भट (शिवाजीनगर, बडोदा) व दीपक चौरे (गंगूबाई चाळ, जाधव संकुल, सिडको) या तिघांना अंबड पोलिसांनी गस्त घालताना जेरबंद केले. त्यांच्याकडून काळी बॅग, बनावट चाव्या, चाकू हस्तगत केले. संशयितांना चार दिवस पोलिस कोठडी सुनावण्यात आली.