आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

राज्यात सुरू होणार तीन स्किल लॅब, माता-बालमृत्यू रोखणार

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
नाशिक - ग्रामीण, अदिवासी भागांत होणारे बालमृत्यू व माता मृत्यू रोखण्यासाठी आरोग्य विभाग राज्यात तीन स्किल लॅब सुरू करणार आहे. केंद्र शासनाच्या नागपूर येथील ‘दक्ष कौशल’ लॅबच्या धर्तीवर नाशिक, जालना आणि पुणे येथे या लॅब सुरू करण्यात येणार आहेत.
दोन दिवसांपूर्वी नागपूर येथील केंद्राच्या पथकाने जिल्हा रुग्णालयात पाहणी केली. या लॅबच्या माध्यमातून माता बालके व किशोरवयीन मुलींना मिळणाऱ्या आरोग्य सेवांमध्ये सुधारणा करण्याकरिता राज्य शासनाने हा उपक्रम हाती घेतला आहे. सार्वजनिक आरोग्य विभाग नाशिक, पुणे आणि जालना येथे प्रायोगिक तत्त्वावर हे केंद्र सुरू होत आहे.

ग्रामीण भागातील डॉक्टर, परिचारिका आणि कर्मचाऱ्यांना विविध बाबींचे प्रशिक्षण या प्रयोगशाळेच्या माध्यमातून मिळणार आहे. प्रसूतीपूर्व सेवा, नोंदणी, प्रसूतीदरम्यान व प्रसूतीपूर्वी सेवा, नवजात बालकांची तातडीची सेवा, कुटूंबकल्याण सेवा व संसर्ग प्रतिबंध सेवा अादीसाठी लागणारी विविध उपकरणे, औषधे तसेच गर्भधारणेपासून ते प्रसूतीपर्यंत लागणारी सर्व वैद्यकीय साधनसामग्री लॅबमध्ये असेल. या माध्यमातून माता-बालमृत्यू टाळता येतील, असा विश्वास जिल्हा शल्यचिकित्सक डॉ.सुरेश जगदाळे, अधिसेविका विजया शेजावळे, डॉ. कपिल आहेर, डॉ.जी.एम. होले यांनी व्यक्त केला.

प्रशिक्षणाचे नियोजन
प्रसूती कौशल्य, गर्भपात, संततीनियमन याचे प्रशिक्षण देण्याचे नियोजन आहे. सहा वैद्यकीय अधिकारी व परिचारिकांनी नागपूर, दिल्लीत प्रशिक्षण घेतले असून इतरांना प्रशिक्षण देण्यात येणार आहे, असे शल्यचिकित्सक डॉ.सुरेश जगदाळे यांनी सांगितले.
बातम्या आणखी आहेत...