आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

तरुणाच्या खूनप्रकरणी तीन संशयितांना अटक

9 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

नाशिक- दिंडोरीरोडवरील रोशन निकम या तरुणाच्या खूनप्रकरणी पंचवटी पोलिसांनी तीन संशयितांना अटक केली आहे. किरकोळ कारणावरून हा निर्घृण खून झाल्याचा अंदाज पोलिसांनी व्यक्त केला आहे.
दिंडोरीरोडवरील आकाश पेट्रोलपंपासमोर रोशन नामदेव निकम (वय 22, रा. तुलसी पूजा रो-हाऊस, कलानगर) या तरुणाचा तीन जणांच्या टोळक्याने किरकोळ कारणावरून धारधार शस्त्राने वार करून निर्घृण खून केल्याची घटना घडली होती.

याप्रकरणी पंचवटी पोलिसांनी मुख्य संशयित शरद पगारे, आरिफ कुरेशी, अमर गांगुर्डे यांना शुक्रवारी पहाटे अटक केली. किरकोळ कारणावरून हा खून झाला असल्याचे वरिष्ठ निरीक्षक बाजीराव भोसले यांनी सांगितले. खुनाच्या अर्धा तासापूर्वी मयत रोशन याने संशयितांना शिवीगाळ केली होती. याचा राग मनात धरून तिघांनी आकाश पेट्रोलपंपासमोर बोलवून घेत त्याच्यावर वार केले. या हल्ल्यात गंभीर जखमी झालेल्या अवस्थेत त्याला नागरिकांनी खासगी रुग्णालयात दाखल केले. रुग्णालयात उपचार सुरू करण्यापूर्वी डॉक्टरांनी रोशनला मृत घोषित केले. संशयित सराईत गुन्हेगार असून, मयत रोशन त्यांचा मित्र होता, असेही तपासात पोलिसांनी सांगितले.