आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

पालिका आयुक्तांशी ओळख दाखवत 34 लाखांना गंडा, तीन संशयितांना अटक

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
नाशिक- महानगरपालिका आयुक्तांशी अोळख असल्याचे सांगत सामाजिक कार्यकर्ते जकी कोकणी यांच्या नावाचा वापर करत दोन बेरोजगार तरुणांना ३४ लाखांना गंडा घातल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे. या प्रकरणी मुंबई नाका पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. उपआयुक्त लक्ष्मीकांत पाटील यांच्याकडे तक्रार प्राप्त झाली होती. गुरुवारी (दि. १३) तीन संशयितांना अटक करण्यात आली.
 
या प्रकरणी मजहर इस्माईल शेख अल्ताफ बशीरखान पठाण यांनी पोलिसांना दिलेल्या माहितीनुसार, संशयित जहीर शेख, अजीम शेख आणि राहुल ससाण यांनी तक्रारदारांच्या मुलांना ‘नाशिक महानगरपालिकेत नोकरी लावून देतो’, असे अामिष दाखवत जकी कोकणी यांच्या नावे ‘मनपा आयुक्तांशी ओळख आहे, तुम्हारे बच्चों नोकरी नहीं तो बडा धंदा दिला देंगे’, असा फोन करत वेळोवेळी पैसे उकळले. मात्र, पैसे देऊनही काम होत नसल्याने तक्रारदारांनी पैशांची मागणी केली. मात्र, त्यांना जीवे मारण्याची धमकी देण्यात अाली. तक्रारदारांनी पोलिस ठाण्यात धाव घेतली; मात्र मुंबई नाका पोलिसांनी राजकीय दबावाने तक्रार घेण्यास टाळाटाळ केली. तक्रारदारांनी उपआयुक्त पाटील यांच्याकडे धाव घेत घडलेला प्रकार कथन केला. पाटील यांनी त्याची गंभीर दखल घेत संशयितांच्या विरोधात गुन्हा दाखल केला. एक संशयित रिक्षा युनियनचा पदाधिकारी अाहे. संशयितांनी अशा प्रकारे अनेकांना गंडा घातल्याचा संशय असून, कोणाची फसवणूक झाली असल्यास पोलिसांशी संपर्क साधण्याचे अावाहन पाटील यांनी केले अाहे.
 
बातम्या आणखी आहेत...