आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Three Thousand Student Entry Forms For D pharmacy

डी. फार्मसी प्रवेश: तीन हजारांहून अधिक विद्यार्थ्यांचे प्रवेश अर्ज

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
नाशिक- अकरावी आणि पॉलिटेक्निक अभ्यासक्रमांच्या प्रवेशप्रक्रिया अंतिम टप्प्यात आली असताना, प्रवेशापासून वंचित राहिलेल्या विद्यार्थ्यांना डिप्लोमा इन फार्मसी (डी. फार्मसी) या व्यावसायिक अभ्यासक्रमाची संधी उपलब्ध झाली आहे. महाराष्ट्र राज्य तंत्रशिक्षण संचालनालयातर्फे डी. फार्मसी अभ्यासक्रमाच्या प्रवेशप्रक्रियेचे वेळापत्रक जाहीर झाले असून, आतापर्यंत तब्बल तीन हजार २२९ विद्यार्थ्यांचे प्रवेश अर्ज निश्चित झाले आहेत.
इच्छुक विद्यार्थ्यांना दहा एआरसी सेंटरवरून अर्ज करता येणार आहेत. तंत्रशिक्षण संचालनालयाच्या वतीनेे डी. फार्मसीसाठी प्रवेशप्रक्रिया सुरू झाली आहे. प्रवेश अर्जासाठी खुल्या प्रवर्गातील विद्यार्थ्यांना ४०० रुपये, तर आरक्षित प्रवर्गासाठी ३०० रुपये शुल्क आकारण्यात येत आहे. विद्यार्थ्यांनी दि. २९ जून ते १० जुलै या मुदतीत शहरातील एआरसी सेंटरवरून अॅप्लिकेशन किट खरेदी करून www.dtemaharashtra.gov.in/posthscdiploma2015 या संकेतस्थळावर जाऊन ऑनलाइन अर्ज भरावयाचे आहेत.
एआरसी सेंटरवरून सर्व अर्ज पडताळणी करून घेणे आवश्यक आहे. त्यानंतर १३ जुलै रोजी प्रोव्हिजनल मेरिट लिस्ट जाहीर होणार असून, दि. १४ ते १६ रोजी गुणवत्ता यादीतील तक्रारी करता येतील. त्यानंतर १७ जुलै रोजी सायंकाळी वाजता अंतिम गुणवत्ता यादी जाहीर होणार आहे.
नाशिक विभागात यंदा हजार ७३० जागा
नाशिक जिल्ह्यात डी. फार्मसी प्रवेशप्रक्रियेसाठी दहा एआरसी सेंटर सुरू करण्यात आले आहेत. विद्यार्थ्यांना विहित मुदतीत अर्ज करता येणार आहे. डी. फार्मसी अभ्यासक्रमासाठी नाशिक विभागात एकूण ४४ महाविद्यालये असून, त्यात दोन हजार ७३० जागा उपलब्ध करून देण्यात आल्या आहेत.