आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

सिडकोत तीन ट्रक जाळण्याचा प्रयत्न

10 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

सिडको - सिडकोतील पंडितनगर परिसरात सोमवारी पहाटे साडेतीनच्या सुमारास गुंडांनी तीन ट्रक जाळण्याचा प्रयत्न केला. इंधनाचे बोळे टाकून हे ट्रक पेटविण्याचा प्रयत्न करण्यात आला. वाहने जळत असल्याचे नागरिकांच्या त्वरित लक्षात आल्याने त्यांनी धावपळ करून ते विझविले. अन्यथा, तिन्ही ट्रक आगीच्या भक्ष्यस्थानी पडले असते.
यातील दोन आयशरचे ट्रक (एम. एच.- 15. ए. जी.-2513 व एम.एच.-15.ए.जी.-816) बांधकाम व्यावसायिक सोपान सानप व राजेंद्र घुगे यांच्या मालकीचे आहेत. तर तिसरा टाटा 407 (एम. एच.-15 जी-4133) राजेंद्र अलगट यांचा आहे. तिन्ही ट्रकमध्ये बांधकामाचे काही साहित्य व ताडपत्री होती. ते मोठ्या प्रमाणात जळाले आहे. या प्रकारानंतर सकाळी नागरिकांनी अंबड पोलिस ठाण्यावर मोर्चा काढून निवेदन दिले.
कारण नसताना त्रास - पहाटेच्या सुमारास आमच्या वाहनांना आग लावण्यात आली. आसपासच्या नागरिकांनी तत्परतेने आगीवर नियंत्रण मिळविले नसते तर मोठे नुकसान झाले असते. कारण नसताना आमची वाहने जाळण्याचा प्रयत्न होतो, कामगारांना लक्ष्य केले जाते, याचे वाईट वाटते. - राजेंद्र अलगट, वाहनमालक
नागरिकांत घबराट - वाहने जाळणा-या गुंडांना पकडून पोलिसांनी त्यांच्यावर कारवाई करावी. समाजकंटकांनी लक्ष्य केल्यामुळे हा परिसर दहशतीच्या छायेत आहे. नागरिक घाबरले आहेत. पोलिसांनी गस्त वाढवून दिलासा दिला पाहिजे. - सोमनाथ तडाखे, नागरिक
गुंडांवर कारवाई करू - या घटनेचा त्वरित तपास सुरू केला आहे. यास जबाबदार असलेल्या गुंडांवर योग्य ती कारवाई केली जाईल. नागरिकांनीही पोलिसांना सहकार्य करावे. घटनेविषयी अधिक माहिती असल्यास पोलिसांशी संपर्क साधावा. - बाळकृष्ण बोरकर, वरिष्ठ पोलिस निरीक्षक, अंबड