आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

नाशिकराेड भागात होणार तीन ठिकाणी भाजीबाजार

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
नाशिकराेड - शहरातील हाॅकर्स झाेनचे काम पूर्ण झाले असून, येत्या अाठवडाभरात हाॅकर्स झाेनची घाेषणा हाेऊ शकते. त्यामुळे हाॅकर्स झाेनची घाेषणा झाल्यानंतर महापालिकेच्या वतीने नाशिकराेड परिसरात तीन ठिकाणी भाजीबाजार सुरू केले जाणार असल्याची माहिती महापालिकेचे उपायुक्त दत्तात्रय गाेतिसेे यांनी गुरुवारी (दि. १९) दिली.
हाॅकर्स झाेनचा अहवाल महापालिका अायुक्तांना सादर करण्यात अाला असून, येत्या अाठवड्याभरात त्यावर निर्णयाची अपेक्षा अाहे. यासंदर्भातील निर्णयानंतर सिन्नरफाटा येथे बंद पडलेला भाजीबाजार पुन्हा सुरू करण्याचा महापालिकेचा विचार अाहे. सिन्नरफाटा बाजूकडून रेल्वेचे प्रवेशद्वार सुरू झाले असून, तेथील अगाेदरच्या भाजीबाजाराचे शेड जैसे थे असल्याने तेथे बाजार सुरू करण्याचे प्रस्तावित अाहे.जेलराेड येथे के. एन. केला हायस्कूलच्या बाजूच्या महापालिकेच्या जागेत, तसेच देवळालीगावातील यशवंत मंडईत बाजार सुरू केला जाणार अाहे.

हाॅकर्स झाेनच्या घाेषणेनंतर विक्रेत्यांना अाेळखपत्र दिले जाणार असून, त्यावर बारकाेड असल्याने कोणीही बनावट अाेळखपत्र तयार करू शकणार नाही.विक्रेत्यांना नेमून दिलेल्या ठिकाणी व्यवसाय करावा लागणार असून, तेथे नवीन विक्रेता व्यवसाय करणार नाही याची जबाबदारी तेथील विक्रेत्यांवर साेपवली जाणार असल्याची माहितीही गाेतिसेे यांनी दिली.