आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

पालिकेतर्फे शहरात अाता ‘अाॅपरेशन डेंग्यू’

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
नाशिक - डेंग्यूची२६ दिवसांत पाचशेहून अधिक संशयित दाेनशेहून अधिक रुग्णांना लागण झाल्यानंतर खडबडून जागे झालेल्या महापालिकेने अाता शहरात ‘अाॅपरेशन डेंग्यू माेहीम हाती घेतली अाहे. त्याचाच एक भाग म्हणून पाणी साठवणाऱ्यांना नाेटिसांचा मारा केला जाणार असून, प्रसंगी दंडाची कारवाई हाेणार अाहे. महापालिका मुख्यालयासह शहरातील अनेक इमारतीच्या तळमजल्यावर साचलेले पाणी काढले जाणार अाहे.

महापाैर अशाेक मुर्तडक यांच्या अध्यक्षतेखाली गटनेते अधिकाऱ्यांची संयुक्त बैठक झाली. शहरात डेंग्यूचा उद्रेक वाढत असून, मनसे नगरसेविकेच्या मुलाला डेंग्यूची लागण झाल्यानंतरही अाराेग्य विभाग ढिम्म असल्यामुळे प्रकरणाचे गांभीर्य वाढले हाेते. या असंवेदनशीलतेच्या मुद्यावरून सत्ताधारी मनसेला शिवसेनेसह राष्ट्रवादीने लक्ष केले हाेते. त्याची दखल घेत महापाैर दालनात बैठक झाली. यात शहरातील अस्वच्छता साफसफाईचा अाढावा घेण्यात अाला. विभागीय अाराेग्यधिकाऱ्यांकडून कारवाईची माहिती घेतल्यावर त्यांनी बाेटावर माेजण्या इतक्याच नाेटिसा दिल्याचे समाेर अाले. शहरात अनेक ठिकाणी पाणी साचले असून, त्याची डेंग्यू डासांची उत्पत्ती हाेत असल्याचे दिसूनही कारवाई हाेत नसल्यामुळे जाब विचारला. त्यानंतर अाता मागे काय झाले, यावर खल करण्यापेक्षा अाॅपरेशन डेंग्यूसाठी नियाेजन झाले. त्यात जुन्या नवीन इमारतींच्या तळमजल्यावर साचणारे पाणी काढण्याच्या सूचना केल्या. महापालिका मुख्यालयाच्या बेसमेंटलाही सक्शन मशीन लावून पाणी काढावे अशा सूचना महापाैरांनी केल्या. सिडकाेत पाणी साठवून ठेवण्यासाठी माेठे कंटेनर असून, त्यात डेंग्यूची पैदास हाेत असल्याची कैफियत मांडली. याठिकाणी धूर वा अाैषध फवारणीलाही वाट नसल्याची अाराेग्यधिकाऱ्यांनी सांगितल्यावर महापाैरांनी संबंधित लाेकांना नाेटीस बजावून एेकले तर ठीक अन्यथा कारवाई करावी असे स्पष्ट केले. यावेळी उपमहापाैर गुुरमित बग्गा, विराेधी पक्षनेत्या कविता कर्डक, गटनेता अनिल मटाले, पश्चिम प्रभाग सभापती शिवाजी गांगुर्डे यांच्यासह पदाधिकारी उपस्थित हाेते.

पेस्ट कंट्राेलचे कामच बेकायदेशीर : स्थायी समितीने पेस्ट कंट्राेलच्या ठेक्याला रद्द केल्यानंतर शासनाकडे ठराव विखंडनासाठी पाठवला गेला. शासनाने ठेका देण्याबाबत अायुक्तांना अधिकार दिले. त्यानुसार तत्कालीन अायुक्त डाॅ. प्रवीण गेडाम यांनी पेस्ट कंट्राेलचा ठेका दिला असला तरी अद्याप स्थायी समितीसाेबत करारनामा झालेला नाही. तिकडे अाॅगस्टपासून शहरात घाईघाईत पेस्ट कंट्राेलचे काम सुरू झाले. या पार्श्वभूमीवर संजय चव्हाण यांनी पेस्ट कंट्राेलचे काम बेकायदेशीर असल्याचा अाराेप करीत करारनामा नसताना देयक कसे काढणार असा सवाल केला. लेखाधिकारी लेखापरीक्षकांचे लक्ष काेठे असाही टाेला त्यांनी लगावला. दरम्यान सभागृहनेतेे सुरेखा भाेसले यांनी पत्र देवून पेस्ट कंट्राेलकडून शहरात धूर वा अाैषध फवारणीच्या नावाखाली धूळ फेक केली जात असल्याचा अाराेप करीत त्यांच्याच बेजबाबदारपणामुळे शहरात साथ पसरल्याचा दावा केला. त्यांच्या कामाची शहानिशा करून देयक अदा करावे अशी मागणीही केली.

एसटी,सिक्युरिटी प्रेस, बाजार समितीलाही नाेटीस : एसटी महामंडळाचा पंचवटी येथील डेपाे, नाशिकराेड येथील भारतीय प्रतिभूती मुद्रणालय तसेच नाशिक बाजार समितीला अस्वच्छता पसरवल्याबद्दल नाेटीस बजावण्याचे अादेश दिले. एसटी डेपाेत अनेक जुने टायर असून ती वारंवार सांगून काढली जात नाही. सिक्युरिटी प्रेसमध्ये भंगार पडून अाहे. बाजार समितीत सडलेला भाजीपाला उघड्या गटारीमुळे अाराेग्य धाेक्यात अाल्याकडे लक्ष वेधले.
बातम्या आणखी आहेत...