आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

...वाचवले ‘गोड-गोजिरी’चे प्राण, फेकलेल्या अर्भकाला वाचवण्यासाठी झटले रहिवासी

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
पाथर्डी फाटा येथे कचऱ्यात फेकलेले हेच ते गोंडस बाळ.
सिडको - पाथर्डी फाटा परिसरातील मुरलीधरनगर येथे एका हॉटेलमागे खाणीतील कचऱ्यात दोन तासांपूर्वी फेकून दिलेल्या गोंडस अर्भकाचे प्राण वाचवून तेथील रहिवाशांनी माणुसकीचा मोठाच आदर्श ठेवला. गुरुवारी दुपारी १२ वाजेच्या सुमारास तृप्ती सुळगावकर या परिसरातून जात असताना त्यांना बाळाच्या रडण्याचा आवाज आला. त्यांनी ही बाब शेजारील हॉटेलमधील कर्मचाऱ्यांच्या लक्षात आणून दिली. जवळील खाणीत कचरा टाकला जातो. तेथून हा आवाज येत असल्याचे निष्पन्न झाले. प्लास्टिक पिशवीत कोंबून या बालिकेला तेथे टाकले होते. काही जागृत नागरिकांनी तत्काळ ही बाब इंदिरानगर पोलिस ठाण्याला कळविली. काहींनी ‘१०८’ रुग्णवाहिका बोलाविली आणि सुरू झाली बाळाचे प्राण वाचवण्याची धडपड. दत्तू बागुल, राजेंद्र गाडेकर, ज्ञानेश्वर ढोली, अनिल पवार, शोभा गाडेकर, केतकी गाडेकर, सौ. साळवे आदींनी धावपळ करून अखेर अर्भकाला वाचवलेच.पोलिसांनी माहिती मिळताच तेथे धाव घेतली अर्भकाला शासकीय रुग्णालयात दाखल करण्यात आले.

मध चाटताच बाळ शांत... : एकजिवंत गोंडस बालक कचऱ्यात टाकलेले पाहून नागरिकांचा संताप अनावर झाला. रडणाऱ्या बालकाला कुणीतरी मध चाटविले आणि ते हसू लागले. पोटचा गोळा अशा पद्धतीने कचऱ्यात फेकून देण्याच्या वृत्तीबद्दल चीड येऊनही सर्वांना समाधान मात्र अर्भकाचे प्राण वाचवल्याचे होते.
पुढे वाचा.. गुन्हा दाखल केला