आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

तिडके काॅलनी पूल कठड्यांअभावी धाेकादायक; महापालिकेचे दुर्लक्ष

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
नाशिक- तिडके काॅलनीकडून गाेविंदनगरकडे जाणाऱ्या रस्त्यावरील पुलाचे लाेखंडी संरक्षक कठडेच गायब झाले असल्याने वाहनचालकांना अक्षरश: जीव मुठीत घेऊन मार्गक्रमण करावे लागत अाहे. २० दिवसांपूर्वी नासर्डीला (नंदिनी) अालेल्या पुरात हे कठडे वाहून गेले. मात्र, महापालिकेच्या उदासीन प्रशासनाचे त्याकडे अद्याप लक्ष गेलेले नाही. एखाद्या दुर्घटनेची वाट प्रशासन बघत अाहे का, असा संतप्त सवाल वाहनचालक विचारीत अाहेत.

शहरात अाॅगस्ट राेजी जाेरदार पाऊस हाेऊन गाेदावरीला महापूर अाला हाेता. तसेच, ठिकठिकाणी पाण्याचे तळे साचले हाेते. नासर्डीलाही पूर येऊन पाणी रस्त्यावर अाले हाेते. तिडके काॅलनीतून गाेविंदनगरकडे जाणाऱ्या रस्त्यावर असलेल्या नासर्डीलाही पूर अाल्याने पुलावरून नदीचे पाणी गेले. त्यात या पुलाला लावलेले दुतर्फा लाेखंडी कठडे वाहून गेले. त्यानंतर पुलाला कठडे लावण्याचे कर्तव्य महापालिका प्रशासनाने बजावलेच नाही. परिणामी, वाहनचालकांना सध्या पूल अाेलांडताना माेठीच चिंता लागलेली असते.

मुळात, हा पूल अतिशय अरुंद असून त्यावरून दाेन वाहने एका वेळी जाऊ शकतात. त्यात अवजड वाहन अाल्यास उर्वरित वाहनांना पलिकडे थांबून घ्यावे लागते.

पुलाच्या जवळच झाेपडपट्टीही असून अनेक घरांचे दरवाजे रस्त्यापर्यंत अालेले अाहेत. पुलाजवळ वळण रस्तादेखील अाहे. त्यामुळे या भागातून वाहन चालविताना चालकांना माेठीच कसरत करावी लागते. त्यातच २० दिवसांपासून या पुलाला कठडेच नसल्याने वाहन नदीत पडण्याची भीती व्यक्त केली जात अाहे. या पुलावर छाेटा अपघात झाला तरी त्याच्या धक्क्याने वाहन नदीत पडण्याची शक्यता व्यक्त करण्यात येत अाहे. त्यामुळे या पुलाला तातडीने कठडे बसवावे, अशी मागणी केली जात अाहे.
बातम्या आणखी आहेत...