आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

सुंदरपूर येथे दहशत पसरवणारा बिबट्या अखेर जेरबंद, शेतक-यांनी सोडला सुटकेचा नि:श्‍वास

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
नाशिक- निफाड तालुक्‍यातील सुंदरपूर येथे दहशत पसरविणा-या बिबट्याला जेरबंद करण्यास वन विभागाला यश आले आहे. बिबट्या जेरबंद झाल्‍यामुळे येथील शेतक-यांनी सुटकेचा नि:श्‍वास सोडला आहे.  
 
सुंदरपूर येथे गेल्या पंधरा दिवसापासून बिबट्याचा मुक्तपणे संचार वाढल्याने शेतात वाड्या-वस्त्यावर राहणाऱ्या शेतक-यांमध्ये भितीचे वातावरण पसरले होते. परिसरातील बकऱ्या, कुत्रे यांना या बिबट्याने भक्ष केले आहे. शेतकऱ्यांच्या तक्रारीवरून वनविभागाने चीचबन येथे दोन दिवस आधी पिंजरा लावला होता. या पिंजऱ्यात सावज म्हणून कोबंडी ठेवण्यात आली होती. बुधवारी सकाळी हा बिबट्या पिंजऱ्यात अडकल्याचे शेतकऱ्यांच्या निदर्शनास आले. त्‍यानंतर वनविभागाला याबाबत कळविण्यात आले. नंतर वनविभागाच्या टीमने घटनास्‍थळी धाव घेत पिंज-यात अडकलेल्या बिबट्यास ताब्यात घेतले.
 
गोदाकाठ व कादवा काठ हा भाग पाण्याने संपन्‍न असल्याने याभागात उसाचे क्षेत्र मोठ्या प्रमाणावर आहे. यामुळे बिबट्याला येथे लपण्यास मुबलक जागा उपलब्‍ध आहे. या भागात बिबट्याचा सततचा वावर असल्‍यामुळे याभागातील शेतकरी नेहमी दहशती खाली असतात. बिबट्याचे दर्शन झाले कि शेतात मजूरही कामाला जात नव्‍हते. मागील काही दिवसांत तालुक्यातील विविध गावांतून तब्‍बल आठ बालके बिबट्यांनी भक्ष केलेली आहे. त्‍यामुळे या भागातील शेतकरी प्रचंड दहशतखाली होते. त्यामुळे या बिबट्याचा कायमस्वरूपी बंदोबस्त करण्याची मागणी शेतक-यांकडून होत होती. पूर्वी रात्रीच्या वेळी उसाच्या शेतातून कोल्ह्याचा आवाज येत शेतक-यांना ऐकू येत असत. बिबट्याचा वावर वाढल्यापासून कोल्ह्यांचे प्रमाण घटल्याने त्यांचा आवाजही याभागातून गायब झाला आहे.
 
पुढील स्‍लाइडवर पाहा...जेरबंद केलेंडर बिबट्याचा व्हिडिओ... 
 
बातम्या आणखी आहेत...