आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

खंडणी प्रकरणी ‘टिप्पर’च्या अाठ गुंडांना मोक्का

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
नाशिक - फळ विक्रेत्याकडे पाच लाखांची खंडणी मागणारे कुख्यात टिप्पर गँगच्या पाच संशयितांवर महाराष्ट्र संघटित गुन्हेगारी प्रतिबंधक कायदा (मोक्का) अन्वये कारवाई करण्यात आली. शुक्रवारी न्यायालयाने संशयितांवर कारवाईचे आदेश दिले हाेते. सराईत गुन्हेगार गण्या कावळ्यासह पाच संशयितांवर ही कारवाई करण्यात आली. यापूर्वी टिप्पर गँगचा म्हाेरक्या समीर ऊर्फ छोटा पठाणसह सात गुन्हेगारांवर ही कारवाई करण्यात आली होती.
शहरात गंभीर गुन्ह्यांचे द्विशतक पूर्ण करणाऱ्या कुख्यात टिप्पर गँगच्या पाच गुंडांवर विशेष न्यायालयाने मोक्कान्वये कारवाईचे आदेश दिले. टिप्पर गँगचा मुख्य सूत्रधार गणेश सुरेश वाघ ऊर्फ गण्या कावळ्या, शाकीर नासीर पठाण ऊर्फ मोठा पठाण, शाहिद शेख, मुकेश राजपूत, किरण पेलमहाले, साेन्या बापू पवार, वसिम शेख, देवदत्त घाटाेळ या गुंडांवर मोक्कान्वये कारवाई करण्यात आली आहे. न्यायालयाने संशयितांना ११ जुलैपर्यंत १० दिवस पोलिस कोठडीत ठेवण्याचे आदेश दिले. अंबड येथे एका फळविक्रेत्याकडे लाखांची खंडणी मागितली होती. याप्रकरणी संशयितांच्या विरोधात अंबड पोलिस ठाण्यात खंडणीचा गुन्हा दाखल करण्यात आला होता. सर्व संशयित मध्यवर्ती कारागृहात आहेत. आठ दिवसांपूर्वीच कुख्यात समीर पठाणसह चार सदस्यांना येरवडा, तळोजा, औरंगाबाद, धुळे कारागृहात हलवण्यात आले आहे. गण्या कावळ्यासह टिप्पर गँगच्या इतर सदस्यांनाही कोठडीची मुदत संपल्यानंतर राज्यातील वेगवेगळ्या कारागृहात हलविण्यात येणार आहे. उपआयुक्त श्रीकांत धिवरे, सहायक आयुक्त अतुल झेंडे, वरिष्ठ निरीक्षक मधुकर कड यांनी ही कारवाई केली.
बातम्या आणखी आहेत...