आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

तिरूपती कल्याणोत्सवाचे नाशकात प्रथमच आयोजन

10 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

नाशिक - शहरात प्रथमच तिरूमला तिरूपती देवस्थान माहिती केंद्र मुंबई व नाशिक सेवा समिती ट्रस्ट, कल्याण उत्सव समिती यांच्या संयुक्त विद्यमाने भगवान तिरूपती बालाजी व माता पद्मवती यांचा कल्याणोत्सव सोहळ्याचे आयोजन करण्यात आले आहे.
25 जानेवारी रोजी भोसला सैनिकी महाविद्यालयाच्या मैदानावर या सोहळ्याचे आयोजन करण्यात आले आहे. तिरूपती देवस्थानच्या वतीने महाराष्ट्रात प्रथमच अशा प्रकारच्या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले असून, याचा मान नाशिकला मिळाला आहे. नाशिककरांना या महोत्सवामुळे नि:शुल्क दर्शनाचा व नेत्रदीपक सोहळा बघण्याचा लाभ होणार आहे.
सेवा समितीचे अध्यक्ष नेमिचंद पोद्दार, संरक्षक ब्रिजलाल धूत, कार्याध्यक्ष राजेश पारीक यांनी पत्रकार परिषदेत माहिती दिली. पोद्दार म्हणाले की, तिरूपती देवस्थानच्या वतीने महाराष्ट्रातील हजारो भाविकांच्या दर्शनासाठी सुवर्णसंधी उपलब्ध करून देण्यात आली आहे. तिरूपती येथे विवाह सोहळा बघण्यासाठी तब्बल चार-चार वर्षांची प्रतीक्षा करावी लागते. त्यामुळे देवस्थानच्या वतीने महाराष्ट्रात 20 जानेवारीपासून सलग दहा दिवस वेगवेगळ्या शहरात या कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे.
भोसला महाविद्यालयाच्या मैदानावर 25 तारखेला तिरूपती येथून पुजारी व देवस्थानच्या पदाधिका-यांचा 125 जणांचा जथ्था रथाद्वारे दाखल होणार आहे. याठिकाणी देवस्थानच्या वतीने आकर्षक अशा बालाजी व पद्मावती यांच्या मूर्ती ठेवण्यात येणार आहे. त्यांना आकर्षक सजावट, विद्युत रोषणाई करण्यात येणार असून, भव्य असा 130 बाय 80 चे व्यासपीठ उभारण्यात येणार आहे. सकाळी 8 वाजेपासून दर्शनास प्रारंभ होणार असून, सायंकाळी 6 वाजता प्रमुख विवाहसोहळा संपन्न होणार आहे. तिरूपती बालाजी येथील सोहळाच भाविकांना अनुभवता येणार आहे. याठिकाणी होणा-या विशेष पूजा व सेवेत सहभागी होण्यासाठी समिती सदस्य सुधीर पाठक यांना 9422769504 व प्रदीप बुब यांना 9822025452 या क्रमांकावर संपर्क साधण्याचे आवाहन जगदीश काबरा, समीर मेहता यांनी केले आहे.