आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

मतदानाचा टक्का वाढविण्यासाठी अाज विविध सवलती, हॉटेल्समध्येही सवलत

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
नाशिक - महापालिकेच्या निवडणुकीचा टक्का वाढल्यास त्यातून चांगले उमेदवार निवडून येतील या तत्त्वाच्या अाधारे मतदान वाढविण्यासाठी विविध पातळ्यांवरून प्रयत्न सुरू अाहेत. काही खासगी संस्था, वैद्यकीय सेवा देणाऱ्या संस्था, हाॅटेल्स यांनीही मतदान करणाऱ्यांना सवलती जाहीर केल्या अाहेत. 
 
एमअारअाय सिटीस्कॅनवर सवलत 
महापालिकेच्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर मतदान करणाऱ्यास मुंबई नाका येथील साई हाय-टेक डायग्नाेस्टिक सेंटरमध्ये एमअारअाय सिटीस्कॅन करणाऱ्यास १० टक्के सवलत मिळणार अाहे. या संदर्भात माहितीसाठी ०२५३- ६६१२१११ किंवा ६६१४९७० या क्रमांकावर संपर्क साधण्याचे अावाहन करण्यात अाले अाहे. ही सवलत २१ फेब्रुवारीच्या दिवशीच असणार अाहे. 
 
हॉटेल्समध्येही सवलत 
मतदार जनजागृती करण्याच्या दृष्टीने नाशिक महापालिकेच्या वतीने केलेल्या अावाहनास प्रतिसाद देत हॉटेल मालक-चालक असोसिएशनचे सेक्रेटरी श्रीधर शेट्टी यांनी नाशिकमधील हॉटेल मालक-चालक असोसिएशनमध्ये नोंदणीकृत हॉटेलमार्फत अन्नपदार्थाच्या एकूण बिलावर मतदान करून आलेल्या नागरिकांना १० टक्के सवलत देण्याचे जाहीर केले आहे. त्यासाठी नागरिकांनी मतदान केल्याबाबतची बोटावरील पुसण्याऱ्या शाईची खूण दाखवावी लागणार आहे. ही सवलत २१ फेब्रुवारीलाच असणार अाहे. 
 
मतदार सेल्फी स्पर्धेचे आयोजन 
युवावर्गामध्ये सध्या मोठ्या प्रमाणात स्मार्ट मोबाइल फोनद्वारे सेल्फी काढण्याच्या सवयीचे प्रमाण अधिक आहे. याचा युवा मतदार आकर्षित होण्यासाठी कविता राऊत फाऊंडेशन, नाशिक सिटीझन्स फोरम, नाशिक इंडस्ट्रियल मॅन्युफॅक्चरिंग असोसिएशन, अंबड इंडस्ट्रियल मॅन्युफॅक्चरिंग असोसिएशन आणि क्रेडाईतर्फे “मतदार सेल्फी’ स्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे.
 
यासाठी नाशिककरांनी मतदानाच्या दिवशी मतदान केल्यानंतर स्वतःच्या मोबाइलवरून ७७६८००२४२४ या व्हाॅटस अॅपवर मतदान केल्याच्या हाताच्या बोटावरील शाईच्या खुणेसह सेल्फी अपलोड करण्याचे आवाहन करण्यात आले आहे. या स्पर्धेतील भाग्यवान मतदारांना विविध सामाजिक संस्थेमार्फत बक्षीस देण्यात येणार आहेत. बक्षिसांची निवड लॉटरी पद्धतीने करण्यात येणार आहे. 
 
मतदान करा, बोट दाखवा, गिफ्ट मिळवा 
सर्वांनी आपल्या बहुमोल मताचा हक्क बजवावा आणि मतदानाचा टक्का वाढावा, यासाठी अमृतधाम येथील बाफणा बाजार या मॉलच्या संचालकांनी “व्होट करा, बोट दाखवा आणि एका कुटुंबासाठी एक, नामवंत कंपनीचे गॅस लायटर मिळवा’, असा उपक्रम हाती घेतला आहे. २२ फेब्रुवारी रोजी सकाळी पासून रात्री पर्यंत ही संधी खुली असेल. त्यासाठी अधिकाधिक नागरिकांनी मतदान करा, असे आवाहनही त्यांनी केले. 
बातम्या आणखी आहेत...