आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

बंडाळी रोखण्यासाठी सरसावले सेना, भाजप नेते; शिवसेनेतील घडामाेडींची खा. देसाईंकडून चाैकशी

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
निवडणुकीत वादग्रस्त ठरलेले सुधाकर बडगुजर, विनायक पांडे, रत्नमाला राणे यांना सूचना देताना खासदार अनिल देसाई. - Divya Marathi
निवडणुकीत वादग्रस्त ठरलेले सुधाकर बडगुजर, विनायक पांडे, रत्नमाला राणे यांना सूचना देताना खासदार अनिल देसाई.
नाशिक - निवडणुकीच्या ऐन भरात विराेधी पक्षावर तुटून पडण्याची वेळ अाली असताना प्रत्यक्षात शिवसेना अाणि भाजपला अंतर्गत बंडानेच हैराण केले अाहे. हा वाद साेडविण्यात माेठाच कालापव्यय हाेत असल्याने अखेर दाेन्ही पक्षांच्या मुंबईतील नेतृत्वानेच सूत्रे हाती घेत पक्षातील गाेंधळ शमविण्याचा प्रयत्न सुरू केला अाहे. त्याचाच भाग म्हणून साेमवारी (दि. ६) शिवसेनेचे सचिव खासदार अनिल देसाई यांनी नाशिकमध्ये येऊन अंतर्गत बंड थांबविण्यासाठी हालचाली केल्या. दुसरीकडे, साेशल मीडियाने त्रस्थ झालेल्या नाशिकच्या भाजपची प्रतिमा उजळविण्यासाठी थेट राज्याच्या मुख्यमंत्र्यांनी सूत्र हलविले अाहेत. यापुढे भाजपवर हाेणाऱ्या अाराेपांचे खंडण करण्यासाठी निवडणूक काळापुरता प्रवक्ता म्हणून अामदार अपूर्व हिरे यांची नियुक्ती त्यांनी केली अाहे.

शिवसेनेत उफाळलेली अंतर्गत गटबाजी एेन निवडणुकीत त्रासदायक ठरू शकते ही बाब अाेळखून पक्षाचे सचिव खासदार अनिल देसाई यांनी साेमवारी (दि. ६) नाशिकमध्ये ठाण मांडून नाराज झालेल्या नेत्यांचे ‘पॅचअप’ करण्याचा प्रयत्न केला. शहरात घडलेल्या घटनांचा अहवालही त्यांनी तयार केला असून, ताे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांना सादर करण्यात येणार अाहे. दुसरीकडे सिडकाेतील प्रभाग क्रमांक २८ मधील एबी फाॅर्म वाटपावरून झालेल्या गाेंधळात मध्यस्थी करीत त्यांनी दीपक बडगुजर अाणि भूषण देवरे या दाेघा उमेदवारांना माघार घेण्याचे अादेश दिले. तर त्यांच्या जागेवर अरविंद शेळके अाणि सतीश खैरनार यांना शिवसेनेने पुरस्कृत केले.
तिकीट वाटपावरून शिवसेनेत काही दिवसांपूर्वी जाेरदार राडा झाला हाेता. माजी महापाैर विनायक पांडे यांनी महानगरप्रमुखांना धक्काबुक्की केल्याने खळबळ उडाली हाेती. त्याचवेळी दुसरीकडे पक्षाच्या नेत्यांनी उमेदवारीसाठी पैसे घेतल्याची नाराजी उमेदवारी मिळालेल्या इच्छुकांकडून जाहीरपणे व्यक्त केली जात हाेती.
 
हे सर्व सुरू असतानाच सिडकाेतील प्रभाग क्रमांक २७ अाणि २८ मधील एबी फाॅर्मचा वाद निर्माण झाला. पक्षाने दिलेल्या उमेदवारांबराेबर अन्य उमेदवारांनाही एबी फाॅर्मचे वाटप करून गाेंधळ घालण्यात अाला. त्यामुळे पक्षातील अंतर्गत गटबाजी उफाळून अाली हाेती. ज्या काळात पक्षाने विराेधकांवर शाब्दिक हल्ला चढवायला हवा, त्याच काळात अंतर्गत वाद उफाळून अाल्याने निवडणुकीत त्याचा माेठा फटका बसेल अशा शक्यतेने खा. अनिल देसाई यांनी नाशिकमध्ये साेमवारी येत पदाधिकाऱ्यांना शांत करण्याचा प्रयत्न केला.

दिलजमाईचा प्रयत्न : धक्काबुक्कीतजखमी झालेले महानगरप्रमुख अजय बाेरस्ते यांच्या जुना गंगापूर नाका परिसरातील निवासस्थानी खासदार देसाई यांनी भेट घेऊन तब्येतीची चाैकशी केली. तसेच, बाेरस्ते कुटुंबीयांना पक्ष अापल्या पाठीशी असल्याचा दिलासा दिला. दुसरीकडे जिल्हाप्रमुख विजय करंजकर, माजी महापाैर विनायक पांडे, नगरसेवक सुधाकर बडगुजर अन्य पदाधिकाऱ्यांनीही भेट घेऊन खासदार देसाई यांच्यासमाेर अापली बाजू मांडली. झालेला वाद विसरून महापालिकेवर भगवा फडकविण्यासाठी प्रयत्नशील रहा, असे अावाहनही त्यांनी यावेळी केले. प्रत्यक्षात करंजकर अाणि पांडे यांच्यात साेमवारी ‘सुसंवाद’ झालाच नाही. 

निवडणुकीनंतरच निर्णय 
शहरातसेनेच्या गाेटात झालेल्या घटनांचीही चाैकशी करीत त्याचा अहवाल पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांना सादर करण्याची तयारी खासदार अनिल देसाई यांनी केली अाहे. एेन निवडणुकीत पक्षात पडझड हाेऊ नये म्हणून यासंदर्भात कठाेर निर्णय तातडीने जाहीर करण्यात अाले नसले तरीही निवडणुकीनंतर मात्र ते घेतले जाण्याची शक्यता अाहे. तसे स्पष्ट संकेतही खासदार देसाई यांनी दिले. 
बातम्या आणखी आहेत...