आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

अकरावीची प्रवेशप्रक्रिया काॅलेजांमध्ये आजपासून

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
नाशिक - इयत्ता अकरावीची प्रवेशप्रक्रिया सोमवार (दि. १५)पासून सुरू होणार आहे. विद्यार्थ्यांना गुणपत्रके मिळाल्यानंतर शहरातील प्रमुख महाविद्यालयांत ऑनलाइन प्रवेशप्रक्रिया होणार असून, सोमवारी दुपारनंतर विद्यार्थ्यांना ऑनलाइन मेरिट फॉर्म भरता येणार आहेत. त्यासाठी त्या-त्या महाविद्यालयाच्या (संस्थेच्या) संकेतस्थळांवर अर्ज उपलब्ध करून देण्यात येत आहेत.
विद्यार्थ्यांना सोमवारी माध्यमिक शाळांमधून गुणपत्रकांचे वाटप केले जाणार आहे. गुणपत्रके मिळाल्यानंतर दुपारी वाजेनंतर कनिष्ठ महाविद्यालयांच्या संकेतस्थळावर ऑनलाइन मेरिट फॉर्म उपलब्ध करून दिले जाणार आहेत. संकेतस्थळावर मेरिट फॉर्मसाठी लिंक उपलब्ध होणार असून, त्याद्वारे विद्यार्थ्यांनी अर्ज भरायचे आहेत. शहरात अकरावीच्या कला, वाणिज्य, विज्ञान किमान कौशल्यावर अाधारित अभ्यासक्रम असलेली ५१ महाविद्यालये असून, २० हजार ८६० जागा आहेत. अकरावीसाठी प्रवेशासाठीच्या अर्जांचे वितरण जमा करण्याची प्रक्रिया १८ जूनपर्यंत होईल, तर संवर्गनिहाय गुणवत्ता यादी, प्रतीक्षा यादी २२ जूनला जाहीर होणार असून, त्यानंतर २५ पर्यंत गुणवत्ता यादीतील विद्यार्थ्यांना प्रवेश दिला जाईल.
शाखानिहाय उपलब्ध जागा
कनिष्ठमहाविद्यालय कला विज्ञान वाणिज्य एकूण
केटीएचएमकॉलेज ७२० १२०० १०८० ३०००
बी.वाय.के. कॉलेज ऑफ कॉमर्स ०० ०० ७२० ७२०
एचपीटी आर्ट‌्स-आरवायके सायन्स कॉलेज ३६० ६०० ९६० १९२०
पंचवटी कॉलेज ३६० २४० २४० ८४०
बिटको बॉईज हायस्कूल ज्युनि. कॉलेज ८० १६० १६० ४००
एसएमआरके महिला कॉलेज १२० १२० ०० २४०
कर्मवीर वावरे महाविद्यालय २४० ३६० ४८० १०८०
भोंसला मिलिटरी स्कूल ०० ८० ०० ८०
भोंसला कॉलेज २४० २४० २४० ७४०
जी. डी. सावंत महाविद्यालय १२० २४० १२० ४८०
व्ही. एन. नाईक कॉलेज १२० २४० ३६० ७२०
प्रमुख महाविद्यालयांची संकेतस्थळे
>‘मविप्र’चीसर्व कनिष्ठ कॉलेजेस : www.mvp.edu.in
>पंचवटीकॉलेज : www.lvhnasik.vriddiedubrain.com
>एचपीटी-आरवायकेकॉलेज : www.hptrykcollege.com
>भोंसला कॉलेज : www.bmc.in,www.bhonsala.in
>बीवायकेकॉलेज : www.bykcollege.com