आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

बाळासाहेब ठाकरे शस्त्र स्मारकाचा अाज सायंकाळी लाेकार्पण साेहळा

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
नाशिक - महापालिकेतील सत्ताधारी मनसेने खासगीकरणातून नवनिर्माणाचा धडाका सुरू ठेवला असून, मंगळवारी (दि. ३) सायंकाळी वाजता स्व. बाळासाहेब ठाकरे यांचे नाव असलेल्या शस्त्र स्मारकाचे लाेकार्पण शिवशाहीर बाबासाहेब पुरंदरे यांच्या हस्ते हाेणार अाहे. काही महिन्यात मनसेच्या ४० पैकी २५ नगरसेवकांनी पक्षाला साेडचिठ्ठी दिली. अाता ठाकरे हे निवडक मावळ्यांसह तटबंदी मजबुतीच्या कामाला लागले असून मागील अाठवड्यात बाॅटनिकल गार्डन तसेच उड्डाणपुलाखाली सुशाेभीकरण कामांचे उ्घाटन अभिनेता नाना पाटेकर यांच्यासह प्रमुख मान्यवराच्या उपस्थितीत झाले. त्याचाच पुढील टप्पा म्हणून शस्त्र स्मारकाचे मंगळवारी सायंकाळी वाजता पुरंदरे यांच्यासह जीव्हीकेचे चारुदत्त देशमुख यांच्या उपस्थितीत होणार आहे. 
 
महापालिकेची अार्थिक स्थिती वाईट असताना खासगीकरणातून महत्त्वाचे प्रकल्प मूर्त रूपात अाणल्यानंतर मनसेला पुन्हा नाशिककर पसंती देतील का? असा प्रश्न खुद्द ठाकरे यांनाच सतावत अाहे. दरम्यान पुनरागमनासाठी धडपड सुरू झाली असून जानेवारीला दुपारी नाशिक दाैऱ्यावर येणारे ठाकरे हे निवडक पदाधिकाऱ्यांसमवेत निवडणुकीबाबत रणनिती ठरवतील. त्यानंतर कार्यकर्त्यांचे प्रवेश हाेणार अाहेत. सायंकाळी या स्मारकाच्या उद‌्घाटननंतर जानेवारीला ठाकरे यांच्या उपस्थितीत बैठकांचा बार उडणार अाहे. निवडणुकीच्या ताेंडावर मनसेत पुन्हा भरती सुरू झाली असून अाता बंडखाेर नाराजांना हेरून मनसेत अाणण्यासाठी भर असणार अाहे. 

 
बातम्या आणखी आहेत...