आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

बँका आज गजबजणार, पण अनेकांना बसेल दंड

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
नाशिक - गेल्या नऊ दिवसांपासून सलग सुट्या आणि वार्षिक लेखापरीक्षणामुळे ग्राहकांसाठी विस्कळीत झालेले बँकांचे कामकाज साेमवार(दि. ६)पासून नियमित हाेत आहे. यामुळे बँका दिवसभर गजबजणार असल्या तरी अनेक ग्राहकांना मासिक हप्ते क्लिअर हाेऊ शकल्याने विनाकारण दंडाचा फटकाही सहन करावा लागणार आहे.

२६ मार्चपासून बँकांचे कामकाज विस्कळीत झाले हाेते. नवीन आर्थिक वर्षाकरिता एप्रिल राेजी बँका सुरू असूनही ग्राहकांसाठी हाेऊ शकलेले कामकाज, शनिवारी झालेले अर्धा दिवस कामकाज आणि नऊ दिवसांत आलेल्या बहुतांश सलग सुट्यांमुळे केवळ अडीच दिवस झालेले बँकिंग याचा सर्व भार साेमवारी बँकांवर असेल.
स्टेट बँकेचे क्लिअरिंग हाऊसमध्ये क्लिअरिंग प्रक्रिया सुरू हाेणार असून, त्याकरिता अतिरिक्त कामकाजही बँकेला करावे लागण्याची शक्यता आहे. निवृत्तिवेतन आणि मासिक वेतनधारकांचे वेतन मंगळवारपर्यंत बँकांत जमा हाेऊ शकणार आहे. दरम्यान, धनादेश भरणा, राेकड काढणे,भरणे यांसारखी कामे माेठ्या प्रमाणावर साेमवारी हाेतील बँकांत गर्दी दिसून येणार आहे.

मार्चअखेर असल्याने आयकर रिटर्नसह विविध बाबींची पूर्तता करण्यात गर्क असलेल्या नाेकरदार व्यावसायिकांना बँकांना सलग नऊ सुट्या आल्याने बँक ग्राहकांना व्यवहार करता आले नाही तसेच आर्थिक व्यवहारांची पूर्तता करण्यात विलंब झाला आहे. ज्या ग्राहकांकडे एटीएम कार्ड नाही, त्यांना तिष्ठत बसावे लागले. आता साेमवारी बँक सुरू झाल्यानंतर व्यवहार सुरळीत हाेणार असले तरी बँकांमध्ये व्यवहारासाठी गर्दी हाेण्याची माेठी शक्यता आहे. त्यामुळे पुढील दाेन दिवस बँकांमध्ये गर्दी राहण्याची शक्यता आहे.

नाहक बसणार भुर्दंड
सलगसुट्यांचा माेठा भुर्दंड नाेकरदार वर्गाला सहन करावा लागणार आहे. त्यांचे वेतन बँकांत जमा हाेऊ शकलेले नसल्याने बहुतांश ग्राहकांना खात्यात पुरेशी शिल्लक ठेवणे शक्य झालेले नाही. दुसरीकडे मात्र गृहकर्ज, वाहन कर्ज, हाेमअप्लायन्सेससाठीचे कर्ज यांच्या मासिक हप्त्यांचेक्लिअरिंग महिन्याच्या पाच तारखेला हाेत असते. हे हप्ते एप्रिलला म्हणजे साेमवारी जाऊ शकणार नसल्याने ग्राहकांना बँकांचा संबंधित वित्त संस्थांच्या दंडाला सामाेरे जावे लागणार आहे. काही वित्त संस्थांनी मात्र एप्रिलपर्यंत ग्राहकांना पुरेशी शिल्लक खात्यात ठेवण्याबाबत सूचना िदल्या असल्याने त्यांना िदलासा िमळाला आहे.