आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

परप्रांतीय मतदारांंना राेखल्याने सेना-भाजप कार्यकर्ते समाेरासमाेर

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
सिन्नर - नगरपालिका निवडणुकीसाठी रविवारी ७०.८६ टक्के मतदान झाले. नेहरू चौकात परप्रांतीय मतदारांना भाजपच्या कार्यकर्त्यांनी मतदान करण्यापासून रोखल्याने सेना-भाजपचे कार्यकर्ते एकमेकांसमोर उभे ठाकल्याने येथे काही काळ तणावाची स्थिती निर्माण झाली होती. त्यामुळे पोलिसांना बळाचा वापर करावा लागला. सौम्य लाठीमार करून दोन्ही बाजूच्या कार्यकर्त्यांना पांगविल्याने येथील तणाव निवळला. उर्वरित ठिकाणी किरकोळ बाचाबाचीचे प्रकार वगळता मतदान प्रक्रिया शांततेत पार पडली.
भाजप आणि शिवसेना यांच्यात सत्तेसाठी झालेल्या घमासानमध्ये काँग्रेस आघाडीसह मनसे आणि अपक्षांनी रंग भरल्याने ही निवडणूक चुरशीची झाली. नगरसेवक पदासाठी १४ प्रभागातील सुमारे ९५ आणि अध्यक्षपदासाठी अशा १०० जणांचे भवितव्य रविवारी सायंकाळी मतदान यंत्रात सीलबंद झाले. दरम्यान सकाळी १२.३० वाजेपर्यंत मतदानाची टक्केवारी २५ टक्के होती. दुपारी अडीच वाजेच्या सुमारास ती ४२.४ तर दुपारी साडेतीन वाजेपर्यंत ती ५७ टक्क्यापर्यंत पोहोचली होती. अनेक ठिकाणी मतदानासाठी मतदारांना रांगा लावाव्या लागल्या. तर काही मतदान केंद्रावर मात्र सकाळच्या सत्रात गर्दी, दुपारी शांतता आणि पुन्हा सायंकाळच्या सुमारास गर्दी असे चित्र पहावयास मिळाले. शिवसेना, भाजपसह, काँग्रेस आघाडी आणि मनसेचे नेते दिवसभर शहरातील विविध मतदान केंद्रावर भेटी देवून तेथील परिस्थिती जाणून घेण्यात व्यस्त होते.

बोगसमतदानावर चॅलेजिंग व्होटचा उतारा
प्रभागक्र. मधील नंबरच्या मतदान केंद्रावर राजू प्रमोद क्षत्रिय यांचे मतदान होते. मात्र, ते येण्यापूर्वीच त्यांच्या नावावर कुणा भामट्याने मतदान ठोकल्याने त्यांची पंचाईत झाली. यावर त्यांनी पुराव्यानिशी हरकत घेतल्यानंतर मतदान अधिकाऱ्यांनी त्यांचे प्रदत्त मतदान (चॅलेजिंग व्होट) करून घेतले. निर्णायक क्षणी मतमोजणीत त्याचा उपयोग होईल. असाच प्रकार प्रभाग क्र. १३ मधील नंबरच्या बूथवर घडला. येथेही रखमा एकनाथ पाचोरे या महिलेच्या नावे अन्य व्यक्तीनेच मतदान केले. त्यामुळे त्यांना मतदानाच्या हक्कापासून वंचित रहावे लागले.

परप्रांतीयमतदारांचा मुद्दा ऐरणीवर
प्रभागमध्ये माळेगावच्या एका कारखान्यातील सुमारे ३०० हून अधिक परप्रांतीयांची नावे समाविष्ट करण्यात आली आहेत. विशेष म्हणजे त्यांचा वंजार गल्लीत रहिवास नसतानाही ते मतदार झाल्याने भाजपचे उमेदवार किरण मुत्रक यांनी त्यावर हरकत घेतली होती. मात्र, उच्च न्यायालयाने ती हरकत फेटाळल्याने त्यांची पंचाईत झाली. मात्र रविवारी हे मतदार मतदानासाठी येऊ लागताच मुत्रक यांच्या समर्थकांनी त्यास विरोध केला. त्यातील एकाने मतदान सोडून पळही काढला. मात्र नंतर त्यास पकडून आणत मतदान करून घेण्यात आले. दरम्यान हे मतदान करून घेण्यासाठी आणि रोकण्यासाठी दोन्ही बाजूने व्यहरचना करण्यात आल्याने दोन्ही गट दिवसाभरात अनेकवेळा समोरासमोर येण्याचे प्रसंग उद‌्भवले.

एक्झिट पोलच्या विरोधात सेनेची तक्रार
मतदान प्रक्रिया सुरू असतानाच दुपारी वाजेच्या सुमारास DM-CHATRA या एजन्सीकडून भाजपच्या नगराध्यक्षासह अन्य २३ उमेदवार विजयी होतील. सेनेचे तर अपक्ष जागेवर निवडून येईल, असा एक्झिट पोल प्रसिद्ध करण्यात आला. मोबाइलवर हे संदेश पसरविण्यात आल्याने शिवसेनेने तत्काळ त्याची दखल घेत निवडणूक आयोगाकडे त्याविरोधात तक्रार केली. आमदार राजाभाऊ वाजे यांचे स्वीय सहायक प्रशांत रायते यांनी निवडणूक आयोगास पत्र लिहिले अाहे.
बातम्या आणखी आहेत...