आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

भगूर नगरपालिकेसाठी ७९.४८ टक्के मतदान, आज मतमोजणी

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
देवळाली कॅम्प - नाशिक जिल्ह्यात सहा नगरपालिकांमध्ये रविवारी मतदान झाले असून, यामध्ये नाशिक महापालिकेच्या निवडणुकीसाठी महत्त्वपूर्ण ठरणाऱ्या भगूर नगरपालिकेमध्ये ११ हजार १८७ मतदारांपैकी हजार ८९१ मतदारांनी मतदानाचा हक्क बजावला. त्यामुळे भगूरला ७९.४८ टक्के मतदान झाले असून, किरकोळ गोंधळ वगळता सर्व मतदान केंद्रांंवर शांतता होती.
भगूर नगरपालिका निवडणुकीसाठी प्रभाग असून, त्यासाठी १७ नगरसेवक निवडून येणार आहेत. तर, नगराध्यक्ष थेट जनतेमधून निवडला जाणार असल्याने जनतेला त्यांनाही मतदान करावे लागणार होते. सकाळी वाजेपासून मतदानाला सुरुवात झाली होती. सकाळी मतदानाला साधारण प्रतिसाद मिळत होता, तर दुपारी उन्हाचा चटका बसत असल्याने मतदानाची टक्केवारी रोडावली होती. मात्र, तीन वाजेनंतर मतदान केंद्रांवर गर्दी दिसून येऊ लागली. भगूर शहरात शिवसेना जिल्हाप्रमुख विजय करंजकर यांचे वर्चस्व असल्याने त्यांचा मतदारांवर दबाव येऊ नये यासाठी भाजपचे शहराध्यक्ष आमदार बाळासाहेब सानप, देवयानी फरांदे, वसंत गिते, लक्ष्मण सावजी, हेमंत गायकवाड, प्रकाश घुगे, बाजीरावभागवत, अंबादास पगारे, सचिन ठाकरे, दिनकर आढाव, बाबूराव मोजाड, भगवान कटारिया हे लक्ष ठेवून होते. तर, भाजपच्या नेत्यांवर लक्ष ठेवण्यासाठी भगूरचे स्थानिक आणि शिवसेना जिल्हाप्रमुख या नात्याने विजय करंजकर, खासदार हेमंत गोडसे, आमदार योगेश घोलप, दत्ता गायकवाड, सूर्यकांत लवटे, राजू लवटे, राजेश फोकणे, विक्रम खरोटे, योगेश देशमुख, शिवा ताकाटे यांच्यासह स्थानिक शिवसैनिक शहरात फिरताना दिसत होते. तर, राष्ट्रवादीतर्फे जिल्हाध्यक्ष अॅड. रवींद्र पगार, अॅड. गोरख बलकवडे, विशाल बलकवडे, अर्जुन टिळे, सचिन पिंगळे, तालुकाध्यक्ष ज्ञानेश्वर गायकवाड, अकबर सय्यद, सोमनाथ खातळे, शहराध्यक्ष मोहन करंजकर, गौरव बलकवडे आदी मान्यवर उपस्थित होते.
बातम्या आणखी आहेत...