आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

मुख्यमंत्र्यांकडे अाज करणार दाेन हजार काेटींची मागणी

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
नाशिक - शहर विकासाच्या दृष्टीने काेणत्या उपाययाेजना राबविता येतील अाणि त्यासाठी राज्य शासनाला नेमकी काेणती पाउले उचलावे लागतील हे जाणून घेण्यासाठी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची रविवारी (दि.२८) दुपारी १२.३० वाजता महापालिकेत प्रशासनाबराेबर बैठक हाेणार अाहेत. या बैठकीत महापालिकेच्या वतीने सादरीकरण केले जाणार असून, विविध प्रकल्पांसाठी सुमारे दाेन हजार काेटी रुपयांची मागणी केली जाणार अाहे. दरम्यान, या बैठकीनिमित्त महापालिकेचे मुख्यालय भाजपमय करण्यात अाले अाहे. 
 
महापालिकेची अार्थिक स्थिती गेल्या काही वर्षांपासून मेटाकुटीस अाली अाहे. ५० काेटी रुपयांच्या अातील उलाढालीवरील उद्याेगांना एलबीटी रद्द करण्याचा निर्णय घेण्यात अाल्याने पालिकेची स्थिती अधिक बिकट झाली अाहे. त्यामुळे अाता महापालिकेला शासनाच्या अनुदानावर विसंबून राहावे लागत अाहे. दरवर्षी अाठ टक्के वाढ गृहीत धरुन अनुदान दिले जात असल्याने महापालिकेला अाता विकास कामे करणेही जड झाले अाहे. अंदाजपत्रकातील अाकडेवारीनुसार भांडवली कामासाठी यंदा केवळ १५८ काेटी रुपयेच उपलब्ध अाहेत. त्यामुळे केवळ अत्यावश्यक सुविधा देण्याव्यतिरिक्त अन्य कामांना कात्री लावावी लागणार अाहे. या पार्श्वभूमीवर मुख्यमंत्र्यांसमवेत हाेणाऱ्या बैठकीला महत्व प्राप्त झाले अाहे. या बैठकीत एलबीटीची कपात टप्प्याटप्प्याने करावी, मुख्यमंत्र्यांच्या बैठकीत विविध रस्ते तसेच अारक्षित जागांच्या भूसंपादनासाठी सुमारे ८०० काेटी रुपये निधी मिळावा, किकवी धरणासाठी ५०० काेटी रुपये निधी, तसेच पाणीपुरवठ्याच्या पाइपलाइनसह विविध प्रकल्पांसाठी एकूण सुमारे दाेन हजार काेटी रुपये निधीची मागणी करण्यात येणार अाहे. तसेच, मुकणेसाठीचा तिसरा चाैथा हप्ता मिळावा, सिंहस्थाचा २३० काेटींचा अतिरिक्त खर्च मिळावा, १४ हजार कर्मचाऱ्यांची पदे भरावीत, स्मार्ट सिटीसाठी ३७४ काेटींचा निधी मिळावा, एलइडीचे काम पालिकेमार्फतच करण्यास मंजूरी मिळावी, किकवी धरण कामाला सुरुवात करून गती द्यावी, इंडियाबुल्सला देण्यात येणाऱ्या पाण्याचे स्वामित्वधन पालिकेला मिळावे, शासनाकडे प्रलंबित निधी तातडीने मिळावे, बांधकामाशी संबंधित प्रश्न मार्गी लागावेत, पिंपळगाव खांबच्या एसटीपीसाठी निधी मिळावा, पाणीपुरवठा कामांसाठी निधी मिळावा इत्यादी मागण्या प्रशासन करणशर अाहे. बैठकीला प्रधान सचिवांसह अायुक्त, अामदार, खासदार, महापाैर, उपमहापाैर सर्व पदाधिकारी, गटनेते उपस्थित राहणार अाहेत. दरम्यान, या दाैऱ्याच्या पार्श्वभूमीवर अधिकारीवर्ग शनिवारच्या सुटीच्या दिवशीही कार्यालयात येऊन विविध कामांची माहिती संकलीत करत हाेते. 
मुख्यमंत्र्यांसमेवेत अाज बैठक असल्याने महापालिका मु‌ख्यालय असे भाजपमय झाले अाहे. 

किकवी धरणाची प्रामुख्याने मागणी 
^किकवी धरणबांधण्यासाठी शासन स्तरावर हालचाली गतिमान व्हाव्यात या धरणासाठी निधी मिळावा या प्रमुख मागणीसह पाणी अारक्षणात वाढ मिळावी, रस्ते अाणि पाणीपुरवठ्यासाठी निधी मिळावा अशा मागण्या अाम्ही मुख्यमंत्र्यांकडे बैठकीदरम्यान करणार अाहाेत. -बाळासाहेब सानप, शहराध्यक्ष, भाजप 

राजीव गांधी भवन सजले 
मुख्यमंत्र्यांच्या दाैऱ्यानिमित्त राजीव गांधी भवन भाजपच्या भगव्या अाणि हिरव्या रंगाच्या झालरने सजविण्यात अाले. मुख्यमंत्र्यांच्या स्वागतासाठी प्रवेशव्दारापासून ते सभागृहापर्यंत रेड कार्पेट अंथरले जाणार अाहे. त्याचप्रमाणे जेथे बैठक हाेणार अाहे, त्या स्थायी समितीच्या सभागृहातील वातानुकुलीत व्यवस्था बदलण्यात अाली अाहे. 

 
बातम्या आणखी आहेत...