आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

धनत्रयाेदशीच्या मुहूर्तावर अाज हाेणार मनपसंत सुवर्ण खरेदी

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
नाशिक - दीपाेत्सवाच्या मंगलमय पर्वाला प्रारंभ झाला असून, शुक्रवारी (दि.२८) धनत्रयाेदशीला नाशिककर साेने चांदीच्या अाभूषणांची मनपसंत खरेदी करणार अाहेत. या मुहूर्तावर केलेला धनसंचय किंवा सुवर्ण खरेदी ही अक्षयकाळ टिकते, असे म्हटले जाते. त्यामुळे गुंजभर का हाेईना साेने खरेदी करावी, अशी इच्छा प्रत्येक गृहिणीची असते. यातच कर्मचाऱ्यांना बाेनस मिळालेले असल्याने शुक्रवारी साेने खरेदीत २५ टक्के वाढ हाेण्याची शक्यता व्यक्त करण्यात अाली अाहे.
अक्षयतृतीयेपासून साेने खरेदीला सकारात्मक प्रतिसाद मिळत असून, या वर्षभरात साेन्याने २० टक्के परतावा दिल्याचे जाणकार सांगतात, यामुळेच साेने खरेदीला ग्राहकांची पसंती मिळते अाहे. या महिन्यात बहुतांश कर्मचाऱ्यांचे बाेनस दसऱ्यानंतर झाले, तर अनेक बहुराष्ट्रीय कंपन्यांतील कर्मचाऱ्यांना एकाच महिन्यात दाेन वेतन एक बाेनस हाती मिळाला अाहे. दिवाळीनंतर लागूनच लग्नसराईही सुरू हाेते अाहे, यामुळे दागिन्यांसह चाेख साेन्यालाही मुहूर्ताच्या खरेदीवर मागणी असेल, असे सराफी व्यावसायिकांनी सांगितले.

अाकर्षक अाॅफर्सचाही ग्राहकांना फायदा : दिवाळीमुळे अनेक अाॅफर्स सराफी पेढ्यांकडून दिल्या गेल्या असून, शहरातील सराफी पेढ्या झळाळल्या अाहेत. दिवसाला टू व्हीलर जिंकण्याची संधी, कार जिंकण्याची संधी, जितके डायमंड घ्याल तितके साेने माेफत अाणि जितके साेने खरेदी कराल तितकी चांदी माेफत, अशा अाकर्षक अाॅफर्स ग्राहकांना खुणावत अाहेत.

स्थानिक बाजारात प्रतिताेळा ३०,५०० रु.
गुरुवारी सायंकाळी घेतलेल्या माहितीनुसार शहरात साेन्याचे दर प्रति दहा ग्रॅमकरिता ३०,५०० रुपयांच्या अासपास, तर चांदीचे दर प्रति किलाेकरिता ४३,५०० रुपयांच्या अासपास हाेते. याचदरम्यान शुक्रवारीही दर राहतील, अशी शक्यता अाहे.

चांदीच्या खरेदीलाही तेवढाच मान
^मुहूर्तावरील चाेखसाेने खरेदीसह येणाऱ्या लग्नसराईमुळे दागिन्यांचीही खरेदी मुहूर्त साधून हाेईल. कमी झालेल्या दरात साेने खरेदीची ही उत्तम संधी असून, चांदीच्या खरेदीलाही तितकाच मान अाहे. -मयूर शहाणे, सराफी व्यावसायिक
बातम्या आणखी आहेत...