आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

पहिल्या श्रावणी साेमवारचा अाज उत्साह, त्र्यंबकला जाण्यासाठी एसटीच्या १५० जादा बस

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
नाशिक - श्रावणातील साेमवारला विशेष महत्त्व अाहे. यानिमित्त भाेलेनाथ शंकर यांच्या शहरातील विविध मंदिरांवर अाकर्षक राेषणाई करण्यात अाली अाहे. अाजचा पहिलाच श्रावणी साेमवार असल्याने मंदिरांमध्ये हाेणारी संभाव्य गर्दी लक्षात घेऊन पाेलिस प्रशासनाने सर्वच मंदिर परिसरात बंदाेबस्त तैनात केला अाहे.
त्र्यंबकेश्वर, साेमेश्वर, सर्वतीर्थ टाकेद या परिसरातील मंदिरांकडे जाण्यासाठी एसटीच्या वतीने खास नियाेजन करण्यात अाले अाहे. नाशिकमधील कपालेश्वर मंदिराजवळील पुराचे पाणी कमी झाल्याने भक्तांमध्ये अानंदाचे वातावरण पसरले अाहे. मंदिर परिसरात बेल-फुले विक्रीची दुकानेही थाटली गेली अाहेत. साेमेश्वर येथील महादेव मंदिर परिसराला यात्रेचे स्वरूप प्राप्त झाले असून, या ठिकाणीही बंदाेबस्त तैनात करण्यात अाला अाहे. येथेही गर्दी हाेण्याची शक्यता अाहे.
बारा ज्योतिर्लिंगांपैकी एक असलेल्या त्र्यंबकेश्वर येथे दर्शनासाठी श्रावण महिन्यात देशभरातून भाविक गर्दी करतात. श्रावणी सोमवारनिमित्त भाविकांची होणारी गर्दी लागोपाठ आलेल्या सुट्या लक्षात घेता राज्य परिवहन महामंडळाच्या वतीने प्रवासी वाहतुकीचे विशेष नियोजन करण्यात आले आहे. भाविकांच्या सोयीसाठी श्रावण महिन्यात परिवहन मंडळाच्या वतीने १५० हून अधिक जादा बस त्र्यंबकेश्वरसाठी सोडण्यात येणार आहेत.
लागोपाठ लागून आलेल्या सुट्यांमुळे त्र्यंबकेश्वर येथे जाण्यासाठी भाविकांच्या संख्येत यंदा वाढ होण्याची शक्यता आहे. या पार्श्वभूमीवर परिवहन मंडळाच्या वतीने मेळा बसस्थानक, निमाणी बसस्थानक, नाशिकरोड बसस्थानकासह विविध स्थानकांतून १५० हून अधिक बस सोडण्याचे नियोजन करण्यात आले आहे. त्यात पहिल्या श्रावणी सोमवारी ५२, दुसऱ्या साेमवारसाठी ६०, तर तिसऱ्या सोमवारसाठी ६० बस सोडण्यात येतील. या व्यतिरिक्त बस वाहतुकीसाठी कमी पडल्यास नाशिक आगारातून वर्गातील फेऱ्या बंद करून श्रावणी सोमवारसाठी जादा वाहतुकीचे नियाेजन करण्यात येणार आहे.

तिसऱ्या सोमवारी विशेष नियोजन
तिसऱ्या सोमवारी त्र्यंबकेश्वर येथे फेरीसाठी त्र्यंबकराजाच्या दर्शनासाठी हजारोंच्या संख्येने भाविक येत असतात. याच पार्श्वभूमीवर होणारी गर्दी लक्षात घेता तिसऱ्या सोमवारसाठी परिवहन मंडळाकडून विशेष नियोजन करण्यात येणार आहे. प्रवासी वाहतूक करताना सुरक्षिततेसाठी वाहकांनाही विशेष सूचना देण्यात आलेल्या आहेत.
बातम्या आणखी आहेत...